• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • छत्तीसगढ विधानसभा निवडणूक : प्रचारतोफा थंडावल्या; काँग्रसने जाहिर केलं भाजप विरोधात आरोप पत्र

छत्तीसगढ विधानसभा निवडणूक : प्रचारतोफा थंडावल्या; काँग्रसने जाहिर केलं भाजप विरोधात आरोप पत्र

छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीसाठी सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकासी 5 वाजता थंडावल्या. तत्पूर्वी काँग्रसने राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात आरोप पत्र जाहिर केलंय.

 • Share this:
  प्रवीण मुधोळकर (प्रतिनीधी) रायपूर, 18 नोव्हेंबर : छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीसाठी सुरु असलेल्या प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकासी 5 वाजता थंडावल्या. 72 जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवार, 20 नोव्हेंर रोजी होणार आहे. विविध पक्षांच्या स्टारप्रचारकांनी सभा, रोड शो आणि पदयात्रेच्या माध्यामातून मतदारांपर्यत पोहचण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, प्रचारतोफा थंडावण्यापूर्वी काँग्रसने राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात आरोप पत्र जाहिर केलं आहे. आदिवासी बहुल आणि छोटं राज्य अशी प्रतिमा असलेल्या छत्तीसगढमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून भाजपची सत्ता आहे. माओवाद, शेतकऱ्यांची कर्जमाफी, धानाला 2500 रुपये हमीभाव देण्याची मागणी अशा महत्त्वपूर्ण मुद्यांवर यंदाची निवडणूक लढली जाणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा निवडणुकीचा प्रचारासाठी छत्तीसकढमध्ये आले होते. तर छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठीच्या प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी काँग्रसने राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात आरोप पत्र जाहिर केले. गेल्या पंधरावर्षाच्या काळात छत्तीसगढमध्ये सरकारने फक्त जनतेला फसवलं असा आरोप काँग्रसने या आरोपपत्र केला आहे. काँग्रेसचे नेत आणि छत्तीसगढचे प्रभारी पी. एम. पुनिया यांनी हे आरोप भाजपवर केले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, माओवाद हे विषय अनुत्तरीतच राहिले असल्याचं काँग्रेसच्यावतीने पुनिया यांनी आरोपपत्रात म्हटलंय. काँग्रेस आणि भाजपच्या या युद्धात काँग्रेस छत्तीसगढ (जोगी)चे अध्यक्ष अजित जोगी यांनी मायावती यांच्या समाजवादी पक्षासोबत युती करत आपली ताकद आजमावणार आहेत. आपण मरण स्विकारू, पण भाजपसोबत जाणार नाही अशी प्रतिज्ञा अजित जोगी यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घेतलीय. तर, दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण करणार असल्याचं आश्र्वासन त्यांनी दिल्याने अखेरच्या क्षणाला प्रचार फैरी चांगल्याच रंगल्या होत्या. VIDEO : ...जेव्हा फोटोग्राफरच्या सांगण्यानुसार दीपवीर पोझ देतात छत्तीसगढ, विधानसभा निवडणूक, प्रचार, नरेंद्र मोदी, काँग्रस, भाजप, आरोप पत्र जाहिर, पी. एम. पुनिया, अजित जोगी
  First published: