VIDEO : 3 महिन्यांची मुलगी निघाली पॉझिटिव्ह, आता नर्सच देत आहेत चिमुकलीला आईची माया

VIDEO : 3 महिन्यांची मुलगी निघाली पॉझिटिव्ह, आता नर्सच देत आहेत चिमुकलीला आईची माया

या नर्सनी माया लावल्याने पहिल्या दिवशी रडणारी ही मुलगी आता शांत झोप घेत आहे. त्यामुळे तिच्या आईलाही मोठा दिलासा मिळाला आहे.

  • Share this:

रायपूर 15 एप्रिल: कोरोनाने जगभर थैमान घातलं आहे. लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच कोरोनाने ग्रासलं आहे. छत्तिसगडमध्ये एका तीन महिन्यांच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. या मुलीवर आता रायपूरच्या AIIMS (All India Institute Of Medical Sciences) मध्ये उपचार सुरू आहेत. मुलगी लहान असल्याने तिच्यासोबत कायम कुणीतरी लागतं. कारण आईला तिच्यासोबत राहता येत नाही. त्यामुळे मुलीच्या आईची तगमग होत आहे. त्या आपल्या पोटच्या मुलीला पाहूही शकत नाहीत. मात्र हॉस्पिटलमधल्या नर्सच आता त्या मुलीची आई झाल्यात. तिला दूध पाजण्यापासून ते तिचं डायपर बदलण्यापर्यंत सगळी कामं या नर्स करत आहेत. या नर्सनी माया लावल्याने पहिल्या दिवशी रडणारी ही मुलगी आता शांत झोप घेत आहे. त्यामुळे तिच्या आईलाही मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना व्हायरसच्या आव्हानाविरुद्ध लढण्यासाठी सरकारी पातळीवरून शक्य तितक्या सर्व पर्यायांचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आधी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या लॉकडाऊनच्या कालावधीत आता वाढही करण्यात आली आहे. त्यानंतर आता मोदी सरकारने त्रिस्तरीय यंत्रणा तयार केली आहे.

त्रिस्तरीय यंत्रणेअंतर्गत रुग्णालये काळजी केंद्र, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बेडमध्ये विभागण्यात आली आहेत. यासर्व यंत्रणेला रुग्णवाहिकेतून जोडले गेले आहे. रुग्णांना गंभीरतेच्या तीव्रतेनुसार उपचार प्रदान केले जाणारा आहेत. सर्व कोविड-19 मधील रुग्ण गंभीर नसतात.

‘कोरोना’रुग्णांना घेण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला, 1 डॉक्टर आणि 3 पोलीस जखमी

कोरोनाच्या जवळपास 80 टक्के रुग्णांमध्ये सामान्य लक्षणे आढळतात. त्याच वेळी 15 टक्के लोकांना ऑक्सिजनची आवश्यकता असते, तर 5 टक्के लोकांना व्हेंटिलेटरची आवश्यकता असते. देशभरात अशी 656 रुग्णालये आहेत जी फक्त कोविड रूग्णांसाठी आरक्षित आहेत. यामध्ये एक लाखाहून अधिक बेड आहेत. त्याचबरोबर देशातील दोन लाखाहून अधिक लोकांना अलग ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत.

धक्कादायक! लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या मजुराच्या पत्नीवर बलात्कार

देशात केवळ 20 हजार व्हेंटिलेटर उपलब्ध होते. त्यामध्ये आता वाढ झाली आहे. रुग्णाच्या आवश्यकतेनुसार व्हेंटिलेटर उपलब्ध राहणार आहे. सरकारकडेही 3.26 कोटी क्लोरोक्विन गोळ्या आहेत. आयसीएमआर, एम्स यांनीही संयुक्तपणे उपचार प्रोटोकॉल तयार केले आहेत.

केंद्र सरकारच्या औषध विभागाला संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बरीच औषधे उपलब्ध नसल्याच्या तक्रारी येत होत्या. त्या संदर्भात विभागाने उच्चस्तरावर आढावा बैठक घेतली.

First published: April 15, 2020, 5:23 PM IST

ताज्या बातम्या