माओवाद्यांच्या हल्ल्यातले ते 13 जवानही शहीद, संख्या गेली 17 वर

माओवाद्यांच्या हल्ल्यातले ते 13 जवानही शहीद, संख्या गेली 17 वर

माओवाद्यांनी मोठ कट रचून सुरक्षा दलांना गुंतवून ठेवलं आणि नंतर गनिमी काव्याने हल्ला केला.

  • Share this:

सुकमा 22 मार्च : छत्तीसगडच्या सुकमा इथं माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 17 जवान शहीद झाल्याचं आता स्पष्ट झालंय. सुकमा जिल्ह्यात चिंतागुफाच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात माओवाद्यांनी हा हल्ला केला होता यात 14 जवान जखमी झाले होते तर इतर 17 जवान बेपत्ता  होते. त्यांच्यासाठी पाचशे जवानांनी आज पहाटेपासुन शोध मोहीम राबवली होती. त्यात सतरा जवानांचे मृतदेह आढळले आहेत. सर्व देश कोरोनाविरुद्ध लढत असताना छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांवर माओवाद्यांनी मोठा आघात केल्याने सुरक्षा दलांना धक्का बसला आहे.

शनिवारी सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत तीन सैनिक ठार झाले तर 14 जवान बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र आता चित्र स्पष्ट झालं असून माओवाद्यांच्या हल्ल्यात 17 जवान शहीद झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर 13 जवान जखमी असल्याची माहितीही दिली जात आहे.

या चकमकीत पाच ते सहा माओवादीही मारले गेले आहेत. या चकमकीमध्ये बरेच माओवादी जखमी झाल्याची माहितीही देण्यात आली आहे.

मुंबईची लाईफलाईन थांबणार! लोकल पूर्णपणे बंद करण्याचा मोदी सरकारनेच घेतला निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, सैनिकांनी मारल्या गेलेल्या माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. जखमी सैनिकांना रायपूर इथल्या रामकृष्ण रुग्णालयात दाखल केलं आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.

माओवाद्यांनी हल्ल्यात सैनिकांना अडकवले

कासलपाड परिसरात मोठ्या संख्येनं माओवादी जमल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. यानंतर डीआरजी आणि एसटीएफची टीम शुक्रवारी दोरनापाल इथून रवाना झाली. ही टीम बुर्कापाळ इथे पोहोचली आणि कोब्रा जवानांच्या सैन्यानं त्यांच्याबरोबर माओवाद्यांविरुद्ध चकमकीसाठी सहकार्य केलं. जवान माओवाद्यांना चकमकीत अडकवण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु सैनिक जंगलात घुसल्याची बातमी आधीच त्यांच्यापर्यंत पोहोचली होती.

गजबजलेल्या कोल्हापुरात 'कोरोना'मुळे स्मशानशांतता, पाहा EXCLUSIVE VIDEO

...आणि म्हणून सैनिकांना जंगलात प्रवेश मिळू शकला

योजनेचा एक भाग म्हणून माओवाद्यांनी जवानांना जंगलात प्रवेश करण्याची मुभा दिली होती. सैनिक कासलपाडच्या पुढे गेले आणि जेव्हा माओवाद्यांना कोणतीही हालचाल दिसली नाही तेव्हा ते परत येऊ लागले. कासलपाडमधून सुरक्षा दलाच्या बाहेर येताच माओवाद्यांनी हल्काला केला. कासलपाडच्या काही अंतरावर कोराज डोंगरीजवळ डोंगराच्या शिखरावरुन सैनिकांवर हल्ला केला. त्यामुळे सुरक्षा दलांचं जास्त नुकसान झालं.

 

 

 

First published: March 22, 2020, 3:40 PM IST

ताज्या बातम्या