जय हो! जवानांनी पाच नक्षलवाद्यांचा केला खात्मा

जय हो! जवानांनी पाच नक्षलवाद्यांचा केला खात्मा

सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. चकमकीदरम्यान जवानांना पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे.

  • Share this:

छत्तीसगड, 24 ऑगस्ट : छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील अबूझमाड परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. चकमकीदरम्यान जवानांना पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. दरम्यान, यात दोन जवानदेखील जखमी झाले आहेत. बस्तरचे (Bastar) आयजी विवेकानंद सिन्हा यांनी चकमकीच्या वृत्तास अधिकृतरित्या दुजोरा दिला आहे. आतादेखील दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असल्याची माहिती आहे. परिसरात जवानांकडून शोधमोहीम राबवली जात आहे.

(वाचा : पुण्यातही काँग्रेसला हादरा? आमदाराने घेतली उद्धव ठाकरेंची भेट)

(वाचा : डोंबिवलीत मनसे फोडणार EVM दहीहंडी.. शहराध्यक्षांना पोलिसांनी बजावली नोटीस)

(वाचा : मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटाबंदीच्या निर्णयात, उद्धव ठाकरेंची PM मोदींवर टीका)

मिळालेल्या माहितीनुसार, ओरछा-गुमरकाच्या जंगलात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चमकम झाली. परिसरात नक्षलवाद्यांचा वावर असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. यानंतर परिसरात शोधमोहीम राबवली गेली. यादरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. जवळपास तासभर ही चकमक सुरू होती. या चकमकीदरम्यान जवानांनी पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं. शोधमोहीमेदरम्यान नक्षलवाद्यांचे मृतदेहदेखील ताब्यात घेण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांचा खासदार सुप्रिया सुळेंवर पलटवार; प्रश्नाला दिलं 'हे' उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 12:05 PM IST

ताज्या बातम्या