मराठी बातम्या /बातम्या /देश /

'मी देशवासियांना आश्वासन देतो...' नक्षलवादी हल्ल्यानंतर अमित शहांची प्रतिक्रिया

'मी देशवासियांना आश्वासन देतो...' नक्षलवादी हल्ल्यानंतर अमित शहांची प्रतिक्रिया

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी यावेळी सांगितले की, 'नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना सरकार आणि देशातली सर्व नागरिकांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही.

  • Published by:  News18 Desk

जगदलपूर (छत्तीसगड), 5 एप्रिल: छत्तीसगड (Chhattisgarh) मधील बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या बॉर्डरवर (Bijapur- Sukma Border) झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात 24 जवानांना वीरमरण आले आहे. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  (Home Minister Amit Shah) यांनी प्रथमच छत्तीसगडचा दौरा केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना या जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी सांगितले कि, 'नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना सरकार आणि देशातली सर्व नागरिकांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. आज आम्ही या प्रकरणावर बैठक केली आहे. मी देशावासियांना आश्वासन देतो की, ही लढाई थांबणार नाही उलट आणखी तीव्र होईल. नक्षलवाद्यांच्या विरोधातील लढाईत अखेर आपला विजय निश्चित आहे.'

अमित शहा यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, 'गेल्या काही वर्षांमध्ये नक्षलवादाच्या विरोधातील लढाई निर्णायक वळणावर आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे ही लढाई आणखी दोन पाऊल पुढे सरकली आहे. मी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत या विषयावर चर्चा केली आहे. आमच्या जवानांचं मनोधैर्य कायम आहे.'

( वाचा : दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला; इस्लामिक स्टेटच्या कमांडरला जम्मूमध्ये अटक )

CRPF सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या घटनेत 24 जवानांना वीरमरण आलं आहे. तब्बल 700 नक्षलवाद्यांचा या घटनेत हात होता. CRPF च्या जवानांना या नक्षलवाद्यांनी चारही बाजूंनी घेरलं होतं. संपूर्ण कट रचून या नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. इतकंच नाही तर या कटामध्ये आंध्रप्रदेश आणि तेलंगणामधील नक्षलवादीही सामील असल्याची नवी माहिती आता समोर आली आहे.

First published:

Tags: Amit Shah, Chhatisgarh, Naxal Attack