मराठी बातम्या /बातम्या /देश /

छत्तीसगड सरकारकडून अजब पॅटर्नची घोषणा; बारावीच्या विद्यार्थांना घरूनच देता येणार परीक्षा

छत्तीसगड सरकारकडून अजब पॅटर्नची घोषणा; बारावीच्या विद्यार्थांना घरूनच देता येणार परीक्षा

Board Exam: कोरोना प्रादुर्भावाचे सर्व नियम पाळून बोर्डाच्या परीक्षा कशा घेता येतील, याबाबत राज्य सरकारे आणि केंद्र सरकार चाचपणी करत आहे. अशातच छत्तीसगड राज्यानं 12 वीच्या बोर्ड परीक्षेची घोषणा केली आहे.

  • Published by:  News18 Desk

रायपूर, 24 मे: मागील काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधित रुग्णांची (Corona Cases) संख्या झपाट्यानं वाढत आहे. परिणामी देशातील विविध बोर्ड परीक्षा (Board) खोळंबल्या आहेत. त्यामुळे कोरोना प्रादुर्भावाचे सर्व नियम पाळून परीक्षा कशा घेता येतील याबाबत राज्य सरकारे आणि केंद्र सरकार चाचपणी करत आहे. अशातच छत्तीसगड राज्यानं 12 वीच्या बोर्ड परीक्षेची घोषणा केली आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी परीक्षा घेण्याचा अजबगजब पॅटर्न जारी केला आहे. छत्तीसगड राज्यात 1 जून ते 5 जून दरम्यान 12 वीच्या परीक्षा घेण्याचं निश्चित केलं आहे. याबाबतचं प्रसिद्धी पत्रकही बोर्डाकडून जारी करण्यात आलं आहे.

काय आहे परीक्षेचा अजब पॅटर्न?

छत्तीसगडमध्ये येत्या 1 जूनपासून 12 वीच्या परीक्षा ऑफलाइन (Offline exam) पद्धतीनं घेण्यात येणार आहे. पण यातील कळीचा मुद्दा म्हणजे या परीक्षा विद्यार्थ्यांना घरी बसून देता येणार आहेत. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाऊन प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका घेऊन येणं आवश्यक आहे. सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एकाच वेळी देण्यात येणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांनी 5 जूनपर्यंत बोर्डाद्वारे दिलेल्या उत्तरपत्रिकेत प्रश्नांची उत्तर लिहिणं अपेक्षित आहेत. सर्व विषयांच्या प्रश्नांची उत्तर लिहिल्यानंतर विद्यार्थ्यांना 6 जून रोजी सर्व उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रावर जमा कराव्या लागतील.

बोर्डानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, उत्तरपत्रिका ऑनलाईन, स्पीड पोस्ट किंवा कुरिअरद्वारे जमा करता येणार नाहीत. त्यांना निर्धारित वेळेत सर्व उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रावर जाऊन जमा कराव्या लागतील. जर एखाद्या विद्यार्थ्याला ठरलेल्या तारखेला उत्तरपत्रिका जमा करता आल्या नाहीत. तर संबंधित विद्यार्थी परीक्षेसाठी गैरहजर मानला जाईल. त्याचबरोबर उत्तरपत्रिका जमा करताना विद्यार्थ्यांना हजेरी लावावी लागेल.

हे ही वाचा-रुग्ण घटले, मृतांचा आकडा जैसे थे; मृत्यूदराच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर

याव्यतिरिक्त परीक्षा केंद्रावर उत्तरपत्रिका जमा करताना विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि मास्क परिधान करणं बंधनकारक ठरवण्यात आलं आहे. छत्तीसगड सरकारच्या या अजब परीक्षा पॅटर्नबाबत अनेकांनी सवाल उपस्थितीत केले असून टीकेची झोड उठवली आहे.

First published:

Tags: Board Exam