रायपूर, 15 मे : छत्तीसगडचे (Chhattisgarh) माजी मुख्यमंत्री अजित जोगी (Ajit jogi) यांचा मेंदू कार्य करत नाही आहे आणि त्याला कार्यरत करण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं उपचार केले जात आहे. अजित जोगी यांच्या ब्रेन अॅक्टिव्हिटीसाठी ऑडिओ थेरेपीनंतर आता इन्फ्रारेड रेडिएशनने उपचार केले जाणार आहेत.
रायपूरच्या श्री नारायणा रुग्णालयात अजित जोगींवर उपचार सुरू आहेत. रुग्णालय प्रशासनानं हेल्थ बुलेटिन जारी केलं आहे. त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झालेली नाही. अद्यापही त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर आता इन्फ्रारेड रेडिएशनने उपचार करणार असल्याचं सांगितलं.
हे वाचा - महाराष्ट्रात पोलिसांभोवती कोरोनाचा विळखा घट्ट, बाधितांची संख्या झाली 1000 पार
श्री नारायणा रुग्णालयाचे संचालक डॉ. सुनील खेमका यांच्या हवाल्यानं जारी करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये 74 वर्षीय अजित जोगींची प्रकृती मात्र आधीप्रमाणेच आहे, असं सांगण्यात आलं आहे. त्यांच्या मेंदूतील कार्य खूपच कमी आहे. ब्लड प्रेशर, हृदय, आणि युरिन आऊटपूट नियंत्रणात आहे. त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
हार्ट अटॅक आल्यानं 9 मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
मंगळवारी डॉ. सुनील खेमका यांनी सांगितलं होतं की, अजित जोगींच्या मेंदूला कार्यरत करण्यासाठी रुग्णालयात त्यांना ऑडिओ थेरेपी दिली जात आहे. याअंतर्गत त्यांना त्यांची आवडती गाणी ऐकवली जात आहे. या थेरेपीनंतर त्यांच्या प्रकृतीत अंशत: सुधारणा झाली आहे. त्यांच्या मेंदूतही थोडी हालचाल पाहायला मिळते आहे. मात्र तरीही त्यांची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.
हे वाचा - लॉकडाऊनमध्ये कुटुंबासोबत घरात होती मेरी कोम, अचानक आले पोलीस आणि...
अजित जोगी हे काँग्रेसचे खंदे नेते आहेत, पण काही काळापूर्वी झालेल्या अपघातात त्यांचा पाय अधू झाला होता. तेव्हापासून जोगी व्हीलचेअरवर आहेत.
संपादन - प्रिया लाड