• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • आठवडाभरानंतर माजी मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत चांगले संकेत; डॉक्टरांनी दिली मोठी माहिती

आठवडाभरानंतर माजी मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत चांगले संकेत; डॉक्टरांनी दिली मोठी माहिती

माजी मुख्यमंत्री अजित जोगींच्या (Ajit jogi) आरोग्याबाबत चांगले संकेत मिळालेत.

 • Share this:
  सुरेंद्र सिंह/ रायपूर, 18 मे : छत्तीसगडचे (chhattisgarh) माजी मुख्यमंत्री अजित जोगी (Ajit jogi) यांच्या प्रकृतीबाबत आता चांगली माहती मिळते आहे. तब्बल आठवडाभरानंतर त्यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाली आहे. रुग्णालय प्रशासनानं ही माहिती दिली आहे.  रायपूरच्या के. श्रीनारायणा रुग्णालयात अजित जोगी यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयानं आज सकाळी हेल्थ बुलेटिन जारी केलं. रुग्णालयाचे संचालक डॉ. सुनील खेमका यांच्या हवाल्यानं जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये सांगण्यात आलं की, अजित जोगी यांचं डोपलर स्कॅन करण्यात आलं. ज्यामध्ये त्यांच्या मेंदूत रक्तप्रवाह होत असल्याचं दिसलं. डॉक्टरांनी सांगितलं की, सध्या ब्रेन अॅक्टिव्हिटीबाबत काही निष्कर्ष काढता येऊ शकत नाही. डॉक्टर त्यांच्या आरोग्यावर सातत्यानं लक्ष ठेवून आहेत. शक्य ते सर्व उपचार केले जात आहेत. हे वाचा - आपल्याच सहकाऱ्याचा मृतदेह पाठवा लागला शवविच्छेदनासाठी, अमरावती पोलीस दलातील घटना 9  मे रोजी हार्ट अटॅक आल्यानं अजित जोगी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांचा मेंदू कार्य करत नाही. अद्यापही ते कोमात असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. देशविदेशातील डॉक्टरांचा सल्ला अजित जोगी यांच्यावर उपचारासाठी देशविदेशातील डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो आहे. रुग्णालय प्रशासनानं सांगितल्यानुसार बंगळुरूतील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थमधील न्यूरोलॉजी विभागाचे प्राध्यापक डॉ. संजीव सिंह यांच्यासह चर्चा सुरू आहे. हे वाचा - काही तासांतच AMPHAN चक्रीवादळ घेणार रौद्र रुप, ओडिशा आणि बंगाल हाय अलर्टवर याआधी सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. विजय कुमार शर्मा यांच्याशी टेली कॉन्फ्रन्सिंगद्वारे चर्चा केली होती. ब्रेन अॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न अजित जोगी यांचा मेंदू कार्यरत करण्यासाठी वेगवेगळे उपचार दिले जात आहेत. त्यांना ऑडिओ थेरेपी दिली जाते आहे. ज्याअंतर्गत त्यांना त्यांच्या आवडीची गाणी ऐकवली जात आहे. या थेरेपीनंतर त्यांच्या प्रकृतीत अंशत: सुधारणा दिसून आली होती. मेंदूत हालचाल होत असल्याचं दिसलं. त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाची हालचाल झाली होती. यावेळी अजित जोगी यांचे पुत्र अमित तिथं उपस्थित होती. हे वाचा - SBI अलर्ट! बँकेने ग्राहकांना पाठवला हा संदेश, दुर्लक्ष केल्यास होणार मोठं नुकसान ऑडिओ थेरेपीशिवाय इन्फ्रारेड रेडिएशनमार्फतही उपचार केले जात आहेत. हे उपचार कायम ठेवले जाणार आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. संपादन - प्रिया लाड
  Published by:Priya Lad
  First published: