• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • माजी मुख्यमंत्री व्हेंटिलेटरवर; अचानक आला Heart Attack

माजी मुख्यमंत्री व्हेंटिलेटरवर; अचानक आला Heart Attack

ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि छत्तीसगड राज्याचे पहिले मुख्यमंत्री राहिलेले अजित जोगी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

 • Share this:
  रायपूर, 9 मे : ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि छत्तीसगड राज्याचे पहिले मुख्यमंत्री राहिलेले अजित जोगी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. श्वास घ्यायला अडचण आल्याने त्यांना रायपूरच्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अजित जोगी हे काँग्रेसचे खंदे नेते आहेत, पण काही काळापूर्वी झालेल्या अपघातात त्यांचा पाय अधू झाला होता. तेव्हापासून जोगी व्हीलचेअरवर आहेत. सकाळी नाश्ता करत असताना अचानक जोगी यांच्या छातीत दुखू लागल्याने पत्नी आणि घरातल्या इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. पूर्वीच्या अखंड मध्य प्रदेशात आणि नंतर छत्तीसगडमध्ये जोगी यांच्या राजकारणाचं अनेक काळ वर्चस्व राहिलं होतं. अन्य बातम्या चप्पल तुटली तरी थांबला नाही प्रवास! पायात पाण्याच्या बाटल्या बांधून धरली वाट

  कोरोना रुग्णांच्या डिस्चार्ज नियमात बदल, आता 'या' अटींनुसार रुग्णालयातून सोडणार

  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published: