S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

छत्तीसगडमध्ये जवानाचा आपल्याच सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार, 4 जणांचा मृत्यू

आज संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास संत कुमार आणि असिस्टंट सब इन्स्पेक्टर गजानंद सोबत भांडणं झालं होतं. त्यानंतर संतापलेल्या संत कुमारने सर्व्हिस रिव्हालरने अंदाधुंद गोळीबार केला

Sachin Salve | Updated On: Dec 9, 2017 10:41 PM IST

छत्तीसगडमध्ये जवानाचा आपल्याच सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार, 4 जणांचा मृत्यू

09 डिसेंबर : छत्तीसगडमध्ये सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये एका जवानाने अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडलीये. या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू झालाय. तर एक जवान गंभीर जखमी झालाय. गोळीबार करणाऱ्या जवानाचं नाव संत कुमार असं आहे.

बाजीपूर बासागुडा कॅम्पमध्ये सीआरपीए जवानाची 168 बटालीयन आहे. आज संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास संत कुमार आणि असिस्टंट सब इन्स्पेक्टर गजानंद सोबत भांडणं झालं होतं. त्यानंतर संतापलेल्या संत कुमारने सर्व्हिस रिव्हालरने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात जागेवरच चार जवानांचा मृत्यू झाला. यामध्ये सब इन्सपेक्टर वीके शर्मा, सब इन्स्पेक्टर मेघ सिंह, असिस्टंट सब इन्स्पेक्टर राजबीर आणि काॅन्स्टेबल जीएस राॅव यांचा मृत्यू झालाय. तर असिस्टंट सब इन्स्पेक्टर गजानंद जखमी झाले आहे.

मृत जवानांचे पार्थिव हेलिकाॅप्टरने बाजीपूर येथे आण्यात आले आहे. तर जखमी गजानंद यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह यांनी या घटनेबद्दल दुख व्यक्त केलंय. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 9, 2017 10:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close