लग्नाच्या वऱ्हाडाला भीषण अपघात, वाहन उलटल्यानं 7 जणांचा मृत्यू

लग्नाच्या वऱ्हाडाला भीषण अपघात, वाहन उलटल्यानं 7 जणांचा मृत्यू

छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाला भीषण अपघात झाला.

  • Share this:

रायपूर, 19 एप्रिल : छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. गुरुवारी (18 एप्रिल) उशीरा रात्री हा अपघात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहन चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात झाला. गिधौरी पोलीस स्टेशन परिसरातील ही घटना आहे. जवळपास 40 जणांचं वऱ्हाड लग्नासाठी निघालं होतं. यादरम्यान ग्राम अमोदीजवळ चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी उलटली. या भीषण अपघातात 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

वाचा अन्य बातम्या

'जर-तर'च्या चक्रव्यूहात RCB, कोलकात्यात विजय आवश्यक

...म्हणून काँग्रेस सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला : प्रियंका चतुर्वेदी

प्रियांका चतुर्वेदी करणार शिवसेनेमध्ये प्रवेश? ही आहे INSIDE STORY

'हेमंत करकरेंना मारून दहशतवाद्यांनी माझं सूतक संपवलं' पाहा VIDEO

First published: April 19, 2019, 1:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading