छत्तीसगडचा गड कोण राखणार? भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार?

दोनही टप्प्यांचं मतदान झाल्यामुळं मुख्यमंत्री रमणसिंग यांचं भवितव्य EVM मध्ये बंद झालंय. आता प्रतिक्षा निकालाच असून 11 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 20, 2018 06:14 PM IST

छत्तीसगडचा गड कोण राखणार? भाजपची 15 वर्षांची राजवट जाणार की राहणार?

प्रविण मुधोळकर, रायपूर, ता.20 नोव्हेंबर : छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यात ७२ जागांसाठी आज मतदान झालंय. दुसऱ्या टप्प्यात मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली असून, छत्तीसगडवासीयांनी भरभरून मतदान केलं. दुसऱ्या टप्प्यात ६५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालंय. दोनही टप्प्यांचं मतदान झाल्यामुळं मुख्यमंत्री रमणसिंग यांचं भवितव्य EVM मध्ये बंद झालंय. आता प्रतिक्षा निकालाच असून 11 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.


छत्तीसगडमध्ये गेल्या १५ वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता आहे. पण चौथ्यांदा भाजपचे रमण सिंग मुख्यमंत्री होणार का? की छत्तीसगडमध्ये सत्ताबदल होईल का याचा निर्णय ११ डिसेंबरला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात झालेल्या ७२ जागांवरील मतदान शांततेत झाल्यानं सुरक्षादलांनी सुटकेचा नि:श्वास टाकलाय. पहिल्या टप्प्यात १८ जागांवर मतदान झालं होतं. दुसरा टप्पा हा भाजप आणि काँग्रेससाठीही महत्त्वाचा आहे.


हे होते महत्वाचे मुद्दे?

Loading...


छत्तीसगडच्या या विधानसभा निवडणूकीत शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार आणि नक्षलवाद हे प्रमुख प्रचाराचे मुद्दे राहिले, तर भाजपकडून विकासाच्या नावावर मतं मागण्यात आली. महाराष्ट्राप्रमाणे छत्तीसगडमध्येही या निवडणूकीत जातीची समिकरणं महत्त्वाची ठरणार आहेत.


जातीची समीकरणं


४५ टक्के ओबीसी मतदार

३२ टक्के आदिवासी मतदार

११ टक्के दलित मतदार

३९ मतदारसंघ राखीव

२९ मतदारसंघ एसटी साठी राखीव

१० मतदारसंघ एससी साठी राखीव

निम्म्या मतदारसंघावर ओबीसीचं वर्चस्व


सलग तीन निवडणुका जिंकलेल्या रमणसिंग यांना यावेळी लोकांच्या नाराजीचा सामना करावा लागला. पण त्यांची स्वच्छ प्रतिमा भाजपसाठी फायद्याची ठरणार आहे. माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनी काँग्रेसशी आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणुक लढवल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे.


 

VIDEO: एक वर्षाची मुलगी रेल्वे ट्रॅकवर पडली आणि समोरून आली एक्सप्रेस...!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2018 06:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...