News18 Lokmat

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात 4 जवान शहीद

चकमकीदरम्यान एका अधिकाऱ्यासह बीएसएफचे चार जवान शहीद झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 4, 2019 03:17 PM IST

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात 4 जवान शहीद

रायपूर, 4 एप्रिल : छत्तीसगडमध्ये कांकेर जिल्ह्यात सुरक्षादलाचे जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एका अधिकाऱ्यासह बीएसएफचे चार जवान शहीद झाले आहेत. तसंच आणखी दोन जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी जवानांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीवर माओवाद्यांकडून बहिष्कार घालण्यात आल्यानं दंडकारण्यात सर्वत्र जवानांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. सीमा सुरक्षादलाचे जवान कोम्बिंग ऑपरेशन करत असताच माओवाद्यांनी जवानांवर भ्याड हल्ला केला. यानंतर जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. माओवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत असताना चार जवानांना वीरमरण आलं. पखांजूर येथील प्रतापपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोहल्ला जंगल परिसरात माओवादी आणि जवानांमध्ये ही चकमक उडाली. चकमकीबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली. आताही परिसरात चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.


Loading...बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 02:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...