माझ्या जेवण्याने दलित पवित्र व्हायला मी श्रीराम नाही - उमा भारती

माझ्या जेवण्याने दलित पवित्र व्हायला मी श्रीराम नाही - उमा भारती

दलितांच्या घरी जाऊन जेवण करण्यासाठी मी प्रभु श्रीराम नाही, असं वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केलं आहे.

  • Share this:

02 मे : पंतप्रधान यांच्या वारंवार सांगण्यानंतरही भाजचे वाचाळवीर काही शांत बसायला तयार नाहीत. कारण केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी नुकतंच दलितांवरून एक वादग्रस्त विधान केलं आहे. मी सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या भोजन समारंभांमध्ये सहभागी होत नाही. दलितांच्या घरी जाऊन जेवण करण्यासाठी मी प्रभु श्रीराम नाही, असं वादग्रस्त विधान उमा भारती यांनी केलं आहे.

दलितांच्या घरी जाऊन जेवण करण्यापेक्षा मी त्यांना माझ्या घरी भोजनासाठी बोलवेन, पण मी दलितांच्या घरी जाऊन जेवणावर नाही असं उमा भारती म्हणाल्या आहेत. 'त्यांच्या घरी जाऊन जेवायला मी काही प्रभू रामचंद्र नव्हे. मी घरी जेवायला गेल्याने ते पवित्र होणार नाहीत. किंबहुना दलित लोक जेव्हा आपल्या घरात येऊन जेवतील तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने पवित्र होऊ.' असंही त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या की, 'जेव्हा दलितांना मी माझ्या हाताने जेवायला वाढेण आणि माझ्यासह माझे कुटुंबिय त्यांची उष्ठी ताट उचलतीत तेव्हा खऱ्या अर्थाने मी धन्य होईल.'

काही वेळाने आपण काय बोलून बसलो याची उपरती उमा भारती यांना झाली. या गावात समरसता भोजन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, हे मला माहिती नव्हते. दलित समाजाच्या लोकांच्या घरी जाऊन त्यांना भेटणे, त्यांची विचारपूस करणे त्यांच्या घरी जेवण करणे या सगळ्या गोष्टी आता मागे पडल्या आहेत, असेही मत उमा भारती यांनी नोंदवले.

दरम्यान, उमा भारती यांच्यासोबत भोजन करण्यासाठी आलेला दलित कुटुंबासाठी ही धक्कादायक बाब होती. आता भाजप नेत्याच्या या वादग्रस्त वक्यव्यावर काय प्रतिक्रिया उमटते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

 

First published: May 2, 2018, 11:23 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading