मराठी बातम्या /बातम्या /देश /कालिचरण महाराज `असे` अडकले पोलिसांच्या जाळ्यात! अटकेपासून वाचण्यासाठी लढवली होती शक्कल पण..

कालिचरण महाराज `असे` अडकले पोलिसांच्या जाळ्यात! अटकेपासून वाचण्यासाठी लढवली होती शक्कल पण..

kalicharan maharaj

kalicharan maharaj

Kalicharan Maharaj News: महात्मा गांधींवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या कालीचरण महाराज Kalicharan Maharaj Latest News) यांना रायपूर पोलिसांनी गुरुवारी छतरपूर जिल्ह्यातील खजुराहो येथील गडा गावातील बागेश्वर धाम येथून अटक केली. त्यांनी नाव बदलून अगदी साधी खोली भाड्याने घेतली होती.

पुढे वाचा ...

  छत्तरपूर, 31 डिसेंबर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वादग्रस्त ठरलेले कालिचरण महाराज (Kalicharan Maharaj) छत्तीसगड पोलिसांचा (Chhattisgarh) ससेमिरा चुकवण्यासाठी मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खजुराहो येथे लपले होते. छत्तीसगडची राजधानी रायपूर (Raipur) येथून मंगळवारी रात्री पलायन करत ते खजुराहो येथे पोहोचले होते. येथून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या गाडा गावातील बागेश्वर धाम येथे त्यांनी आश्रयासाठी 300 रुपये भाडेतत्त्वावर एक साधी खोली घेतली होती. 8 बाय 10 च्या या खोलीला पक्कं छतही नव्हतं. छत म्हणून स्टिलवर चादर टाकण्यात आली होती. यावेळी त्यांच्या समवेत दोन महिलांसह 6 जण होते.

  मिळालेल्या माहितीनुसार, होम स्टे (Home Stay) अर्थात तात्पुरत्या आश्रयासाठी खोली घेतली तेव्हा कालिचरण महाराजांनी मास्क लावला होता, त्यामुळे त्यांना कोणीही ओळखू शकलं नाही. ही खोली राजू या नावानं बुक होती. त्यांनी स्वतः सर्व साहित्य या खोलीत आणले. त्यांनी स्वतः करता आणि साथीदारांकरिता 103, 109 आणि 112 या क्रमांकाच्या खोल्या घेतल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री खोलीत गेल्यावर ते बुधवारी सकाळी उशीरापर्यंत खोलीतून बाहेर आले नाहीत. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता ते बागेश्वर धाम मंदिरात गेले. त्यानंतर मध्यरात्री सुमारे तीन वाजेदरम्यान परतले. कालिचरण महाराज पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी त्या ठिकाणी तळ ठोकला होता. मात्र, याबाबत माहिती कोणालाही नव्हती. कारण पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये होते. रात्रभर भर थंडीत शेकोटी पेटवून पोलीस (Police) महाराजांची वाट पाहात बसले होते. 3 वाजेच्या सुमारास महाराज येथे पोहोचताच त्यांना पोलिसांनी अटक (Arrest) केली. छत्तीसगड पोलीस सुमारे 4 वाजेच्या सुमारास कालिचरण महाराजांना घेऊन येथून रवाना झाले.

  कालीचरणला दोन दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात समर्थकांनी दिल्या ‘जय श्रीराम’च्या घोषणा

  कालीचरणला दोन दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयात समर्थकांनी दिल्या ‘जय श्रीराम’च्या घोषणा

  एका खोलीत केवळ 3 लोकांना राहणं शक्य होतं

  ज्या होम स्टेमध्ये कालिचरण महाराज आणि त्यांच्या साथीदारांनी आश्रय घेतला होता, त्या एका खोलीत केवळ 3 लोकांनाच राहणं शक्य होतं. यासाठी एका व्यक्तीकडून 100 रुपये घेतले जात होते. या हिशोबानुसार कालिचरण महाराजांच्या खोलीचं भाडं 300 रुपये होतं. त्यांच्या खोलीत एक पंखा होता आणि खोलीच छत पत्र्याच्या शीटनं झाकून घेतलेलं होतं. येथे त्यांनी जेवणाऐवजी बिस्कीटं खाल्ली आणि मिनरल वॉटर प्यायले. पोलिसांनी अटक केल्यानंतर महाराजांचे कपडे आणि चपला खोलीत अस्ताव्यस्त पडून होत्या.

  छत्तीसगड पोलिसांवर आंतरराज्य प्रोटोकॉलचं (Interstate Protocol) उल्लंघन केल्याचा आरोप

  महात्मा गांधींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कालिचरण महाराज यांना रायपूर पोलिसांनी गुरुवारी सकाळी खजुराहो येथून अटक केली. कालिचरण महाराजांना मध्य प्रदेशातून अटक केल्यानं आंतरराज्य प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचं सांगत मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आक्षेप नोंदवला. मिश्रा म्हणाले की, ``छत्तीसगड सरकारला नोटीस जारी करून बोलवता आलं असतं. अटक करण्यापूर्वी मध्य प्रदेश पोलिसांना कळवणं आवश्यक होतं``. याबाबत छत्तीसगडच्या डिजीपींकडे निषेध नोंदवण्याचे आणि स्पष्टीकरण मागण्याचे निर्देश मध्य प्रदेशच्या डिजीपींना दिल्याचे मिश्रा यांनी सांगितले. दुसरीकडे हा प्रकार योग्य असल्याचं सांगत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी नरोत्तम मिश्रा यांच्यावर टीका केली आहे.

  First published:

  Tags: Mahatma gandhi