एक घर आणि 44 दिवसांत 4 मृतदेह, हत्या आणि आत्महत्येची संशयास्पद घटना

ज्या ठिकाणी त्याने आत्महत्या केली होती, ठीक 44 दिवसांआधी तिथेच त्याच्या पत्नीनेही आत्महत्या केली होती

News18 Lokmat | Updated On: Jan 8, 2019 08:26 PM IST

एक घर आणि 44 दिवसांत 4 मृतदेह, हत्या आणि आत्महत्येची संशयास्पद घटना

मध्य प्रदेश, 08 जानेवारी : त्याने आपल्या मेव्हण्याला फोन करून सांगितलं की, "आता तुझी भेट होणार नाही. मी माझ्या पत्नीकडे चाललोय. ती माझी वाट पाहात आहे.", त्यानंतर त्याचा फोन बंद झाला आणि त्यानंतर मिळाला त्याचा आणि दोन निष्पाप मुलांचा मृतदेह.

एकाच घरातून 44 दिवसांमध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलराम नावाच्या व्यक्तीने राहत्या घरात आत्महत्या केली होती. ज्या ठिकाणी त्याने आत्महत्या केली होती, ठीक 44 दिवसांआधी तिथेच त्याच्या पत्नीनेही आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्याआधी बलरामने आपल्या 7 वर्षाची मुलगी नीलम आणि 5 वर्षाचा मुलगा रंजीत यांचीही हत्या केली होती.

मन सुन्न करणारी ही घटना छतरपूर येथील थुराटी गावात घडली आहे. या गावात एक संपूर्ण कुटुंब संपलं आहे. या तिघांना आत्महत्येपासून रोखता आलं असतं पण कुणीही पुढे आलं नाही. पत्नीच्या आत्महत्येनंतर बलरामने गावात अनेक जणांकडे आपण आत्महत्या करणार असल्याचं सांगत होता. पण, त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवला नाही. अखेर त्याने मुलांची हत्या करून जीवनयात्रा संपवली.

दिल्लीत मजुरी करणाऱ्या बलरामच्या पत्नीने आत्महत्या केली होती. पत्नीच्या आत्महत्येनंतर बलराम अस्वस्थ झाला होता. तिने आत्महत्या का केली? याचं कारण अजूनही कळू शकलं नाही. असं कळतंय की, त्याच्या गैरहजेरीत त्याच्या पत्नीसोबत अत्याचार झाला होता.

या संशयास्पद आत्महत्या प्रकरणाचे पेच वाढला जेव्हा, बलरामच्या मृत्यूनंतर 3 आॅडिओ क्लिप समोर व्हायरल झाल्या होत्या.  या आॅडिओ क्लिपमध्ये बलराम हिमाचलमध्ये राहणाऱ्या मेव्हण्याचा उल्लेख करत होता. तोही असाच मरणा आहे, असं तो सांगत होता.

Loading...

या आॅडिओ क्लिपमध्ये बलराम हा 'पोलीस अधिकारी मला फसवत आहे' असं सांगत होता. पत्नीच्या आत्महत्येनंतर बलरामने न्याय मागण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. पण, त्याचं कुणीही ऐकलं नाही. अखेर बलरामच्या मृत्यूनंतर 3 आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली.


========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2019 08:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...