S M L

चेतन भगतने केलं काँग्रेस जॉईन करण्याचं ट्विट;अनेक लोक झाले 'फूल'

या ट्विटमध्ये त्याने अधिक माहितीसाठी एक लिंक दिली होती. पण ही लिंक मात्र विकीपीडीयाच्या एप्रिल फूल पेजची होती. अनेकांनी ही लिंक पाहिलीच नाही आणि चेतनच्या या ट्विटवर प्रतिक्रिया दिल्या.

Chittatosh Khandekar | Updated On: Apr 1, 2018 09:18 PM IST

चेतन भगतने केलं काँग्रेस जॉईन करण्याचं ट्विट;अनेक लोक झाले 'फूल'

01 एप्रिल: प्रसिद्ध इंग्रजी लेखक आणि मोदी समर्थक चेतन भगत याने  आपण  भाजपच्या राज्याला कंटाळलो असून लवकरच काँग्रेसमध्ये जाणार असल्याचं धक्कादायक ट्विट केलंय. या ट्विटनंतर अनेक लोकांनी शॉक झाल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. पण मुळात हे ट्विटच एप्रिल फूल करणारं होतं . आणि अनेक लोकं फूल झाले ही.

चेतन भगत यांची राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्याबद्दलची मतं सगळ्यांनाच माहिती आहे. मोदींच्या वाढदिवसाला त्यांनी पंतप्रधानांची भेटही घेतली होती. चेतन  भगत आपल्या ट्विटमध्ये म्हणतो 'देशातल्या अनेक गोष्टींची  घडी बसवण्याची गरज आहे. मी काँग्रेस जॉईन करतोय. त्यांच्या कर्नाटक प्रचाराला मी पाठिंबा देणार आहे.राहुल गांधींसोबत एक चांगला भारत बनवूया. या सगळ्यासाठी तुमच्या आशीर्वादांची आणि शुभेच्छांची गरज आहे.' या ट्विटमध्ये त्याने अधिक माहितीसाठी एक लिंक दिली होती. पण ही लिंक मात्र विकीपीडीयाच्या एप्रिल फूल पेजची होती. अनेकांनी ही लिंक पाहिलीच नाही आणि चेतनच्या  या ट्विटवर प्रतिक्रिया दिल्या.

काहींनी याबद्दल चेतन भगतवर टीका केली. कुणी म्हणलं हे तुमच्याकडून अपेक्षित नव्हतं. कुणी राहुल गांधींना पाठिंबा देऊ नका अशी विनंती केली. तर काहींनी चक्क इंग्रजी पुस्तकं लिहण्याइतकं राजकारण सोपं नाही अशी समजही दिली. ज्यांना विनोद कळला त्यांनी मात्र हे ट्विट हसत खेळत घेतलं. तु काँग्रेसमध्ये जात असशील तर मी आयसीसमध्ये जातो असं कुणी लिहिलं.तर हा विनोद विनोदच राहू द्या असंही काही जण म्हणाले.

थोडक्यात ट्विटरवरही किती लोकांना फूल करता येतं हे एप्रिल फूलच्या दिवशी चेतन भगतने सिद्ध केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 1, 2018 09:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close