30 सप्टेंबरपासून या 6 बँकांचे चेकबुक होणार बंद

30 सप्टेंबरपासून या 6 बँकांचे चेकबुक होणार बंद

जर तुम्ही भारतीय स्टेट बँकच्या 5 सलग्न बँकेचे खातेदार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.

  • Share this:

18 सप्टेंबर : जर तुम्ही भारतीय स्टेट बँकच्या 5 सलग्न बँकेचे खातेदार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. एसबीआयमध्ये विलीन झालेल्या इतर पाचही बँकांचे चेकबुक 30 सप्टेंबरपासून बंद होणार आहे.

स्टेट बँकेने विलीन झालेल्या पाच बँकांसह भारतीय महिला बँकेच्या ग्राहकांना सुचना केलीये. जर तुम्ही नव्या चेकबुकसाठी अर्ज केला नसेल तर तातडीने अर्ज करावा. कारण, 30 सप्टेंबरनंतर जुने चेकबुक आणि IFS कोड रद्द होणार आहे.

या बँकांना होणार नवे नियम लागू

एसबीआयने आपल्या ग्राहकांना दिलेल्या सुचनेनुसार इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, ATM या सारख्या सुविधांसाठी तातडीने जवळच्या शाखेत जाऊन अर्ज करावा. एप्रिल 2017 पासून

SBI मध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर (SBBJ), स्टेट बँक ऑफ हैदराबाद (SBH), स्टेट बँक ऑफ म्हैसूर (SBM), स्टेट बँक ऑफ पटियाला (SBP), स्टेट बँक ऑफ त्रावणकोर (SBT) आणि भारतीय महिला बँक यांचं विलिनिकरण करण्यात आलंय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2017 07:07 PM IST

ताज्या बातम्या