• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • शिक्षकाचे कारनामे; टॉवेल गुंडाळून शिकवायचे, अश्लील वर्तन वाढल्यानं विद्यार्थी एकवटले..

शिक्षकाचे कारनामे; टॉवेल गुंडाळून शिकवायचे, अश्लील वर्तन वाढल्यानं विद्यार्थी एकवटले..

विद्यार्थी आणि शिक्षकांचे समाजामध्ये एक वेगळं नातं असतं, मात्र काही शिक्षक त्या नात्याला काळिमा फासण्याचे काम करतात. अनेकदा शिक्षकांनी विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

 • Share this:
  चेन्नई, 24 मे : विद्यार्थी आणि शिक्षकांचे समाजामध्ये एक वेगळं नातं असतं, मात्र काही शिक्षक त्या नात्याला काळिमा फासण्याचे काम करतात. अनेकदा शिक्षकांनी विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. असाच काहीसा प्रकार चेन्नईच्या एका नामांकित विद्यालयामध्ये घडला आहे. शिक्षकाचे (Chennai teacher) असलेच वर्तन चांगलेच वाढल्यानंतर आता त्यांच्या विरोधात विद्यार्थी विद्यार्थिनी एकवटले आहेत. आता त्यांच्या विरोधात माजी विद्यार्थ्यांनी ही बोलण्यास सुरू केली आहे. संबंधित शिक्षकाविषयी मुलांनी आरोप केला आहे की, सध्या ते ऑनलाइन वर्ग घेत असताना कमरेभोवती टॉवेल गुंडाळून शिकवतात. ते आम्हाला अनेकदा अश्लील मेसेज पाठवतात. या शिक्षकाविरोधात आता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अभियान सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक विद्यार्थी आता या शिक्षकाच्या विरोधात सोशल मीडियावरून (Social Media) व्यक्त होत आहेत. संबंधित शिक्षकाविरोधात शाळेच्या प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतरही काहीच उपयोग झाला नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. हे वाचा - ‘त्या दिवशी हृतिकमुळं मी मरणारच होतो’; अभय देओलनं सांगितला जीवघेण्या अपघाताचा थरारक अनुभव हे वाचा - खाली Lockdown म्हणून आकाशातच बांधली लग्नगाठ; पोलिसांच्या इशाऱ्यानंतर वर-वधुच्या उत्साहाचं विमान लँड काही माजी विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, या शिक्षकाने बऱ्याच मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आहे. त्यावेळी कोणीच याविषयी बोलायचं नाही. शिक्षकाच्या भीतीपोटी त्यावेळी आम्ही काहीच बोललो नाही. कारण त्यावेळी ते याबाबत कोण बोलण्याचं धाडस करेल त्याला कमी मार्क देईन किंवा नापास करेन म्हणून भीती घालायचे. आता माजी विद्यार्थ्यांनी मोहीम सुरू झाल्यानंतर या शिक्षकाला तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. फक्त निलंबन नको तर त्याच्यावर चौकशी समिती बसली पाहिजे, असंही आजी-माजी विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. याप्रकारच्या एखाद्या शिक्षकाच्या वर्तनामुळं संपूर्ण शाळा-कॉलेजचे नाव खराब होते. अनेक शिक्षक चांगल्याप्रकारे शिकवायचे काम करत असतात मात्र, याप्रकारच्या शिक्षकांमुळे त्यांनाही त्रास सहन करावा लागतो. अशा प्रकारचे वर्तन करणाऱ्या शिक्षकांची चौकशी होऊन दोषी आढळल्यास कारवाई होण्याची गरज आहे, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: