मराठी बातम्या /बातम्या /देश /

चेन्नईत 41 वर्षीय रुग्णावर तीन वेळा Kidneys Transplant, शरीरात आहेत आता पाच किडनी; डॉक्टरांना हॅट्स ऑफ!

चेन्नईत 41 वर्षीय रुग्णावर तीन वेळा Kidneys Transplant, शरीरात आहेत आता पाच किडनी; डॉक्टरांना हॅट्स ऑफ!

मूत्रपिंड निकामी झाल्यावर एक तर डायलिसिसवर (Dialysis) अवलंबून राहावं लागतं किंवा प्रत्यारोपण अर्थात किडनी ट्रान्सप्लांट (Kidney Transplant) तरी करावं लागतं. नुकत्याच झालेल्या तिसऱ्या शस्त्रक्रियेनंतर शरीरातल्या एकूण पाच किडनीजसह त्या रुग्णाला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं.

पुढे वाचा ...

चेन्नई, 12 ऑगस्ट:  शरीराचा कोणताही अवयव निकामी झाला, तरी त्रास होतोच; मात्र मूत्रपिंड अर्थात किडनीसारखा अत्यंत महत्त्वाचा अवयव निकामी झाला तर होणारा त्रास मात्र खूप मोठा असतो. कारण शरीरातले अनावश्यक घटक मूत्राद्वारे बाहेर टाकण्याचं महत्त्वाचं काम मूत्रपिंड करत असतात. मूत्रपिंड निकामी झाल्यावर एक तर डायलिसिसवर (Dialysis) अवलंबून राहावं लागतं किंवा प्रत्यारोपण अर्थात किडनी ट्रान्सप्लांट (Kidney Transplant) तरी करावं लागतं. चेन्नईतल्या 41 वर्षांच्या एका रुग्णावर आतापर्यंतच्या आयुष्यात तब्बल तीन वेळा किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झाली असून, नुकत्याच झालेल्या तिसऱ्या शस्त्रक्रियेनंतर शरीरातल्या एकूण पाच किडनीजसह त्या रुग्णाला हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं. 'फर्स्टपोस्ट'ने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

संबंधित रुग्णाला तीव्र उच्च रक्तदाबाचा (Severe Hypertension) त्रास होता. तसंच, कोरोनरी आर्टरी डिसीजचं (Coronary Artery Disease) निदान झाल्यानंतर याच वर्षी मार्च महिन्यात त्या रुग्णावर ट्रिपल बायपास सर्जरी (Triple Bypass Surgery) झाली होती. तीव्र उच्च रक्तदाबामुळे त्या रुग्णावर काही दिवसांपूर्वीच झालेली किडनी ट्रान्सप्लांटचे दोन प्रयत्न अयशस्वी झाले होते. त्यानंतर मद्रास मेडिकल मिशनमधल्या (Madras Medical Mission) डॉ. एस. सर्वानन (Dr S. Sarvanan) यांच्या नेतृत्वाखालच्या टीमने तिसऱ्यांदा प्रयत्न करून किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

आधीच्या गुंतागुंतीमुळे ही शस्त्रक्रियाही अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीची (Complex Operation) होती. ही गुंतागुंत वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्या रुग्णाच्या शरीरात असलेल्या अतिरिक्त किडनीज. त्या रुग्णाचा वैद्यकीय इतिहासच (Medical History) अत्यंत गुंतागुंतीचा आहे. आपल्या शरीरात दोन मूत्रपिंडं असतात. संबंधित रुग्ण 14 वर्षांचा असताना (1994 साली) त्याची एक किडनी पहिल्यांदा निकामी झाली. त्या वेळी त्याच्यावर पहिल्यांदा किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करून तिसरी किडनी बसवण्यात आली. त्यानंतर नऊ वर्षांपर्यंत त्याला कोणतीही समस्या आली नाही; मात्र 2005 साली पुन्हा किडनी निकामी झाल्याने त्याच्यावर पुन्हा ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करून चौथी किडनी बसवावी लागली. ती पुढची 12 वर्षं टिकली. त्यानंतरची चार वर्षं मात्र त्या रुग्णासाठी अत्यंत कसोटी पाहणारी ठरली. कारण या कालावधीत त्याला आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करावं लागायचं.

देशात तिसऱ्या लाटेचे संकेत, बंगळुरुत एका आठवड्यात 300 हून अधिक मुलांना कोरोनाची लागण

म्हणून बऱ्याच चर्चेअंती त्याच्यावर पुन्हा किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र याच वर्षी मार्च महिन्यात त्याच्यावर ट्रिपल बायपास सर्जरी झाली होती. तीव्र उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यानंतर केलेली किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया दोन वेळा अयशस्वी झाली होती. अशी सगळी गुंतागुंत असतानाही डॉ. एस. सर्वानन यांच्या टीमने आव्हान स्वीकारलं आणि शस्त्रक्रिया यशस्वी केली.

ज्या किडनी निकामी झालेल्या असतात, त्या शरीरातून काढून टाकल्या जात नाहीत; मात्र रक्तस्राव (Bleeding) होण्याची शक्यता असल्याने नव्या किडनीसाठी शरीरात जागा मात्र तयार करावी लागते, असं डॉ. सर्वानन यांनी सांगितलं. या रुग्णाच्या शरीरात मूळच्या दोन, नंतर बसवलेल्या दोन अशा चार किडनीज आधीच असताना पाचवी किडनी बसवायची असल्याने हे ऑपरेशन अधिक आव्हानात्मक होतं.

कोरोनाची लस न घेतल्यामुळे वायूदलातून एकजण बरखास्त, एकूण 9 जणांनी दिला लसीकरणाला नकार

ऑपरेशननंतरच्या पहिल्या तपासणीनंतर असं आढळलं, की या रुग्णाची प्रकृती सुधारत आहे. त्यामुळे एकूण पाच किडनीसह त्या रुग्णाला घरी पाठवण्यात आलं आहे. त्या डॉक्टर्सनाही सलाम आणि एवढी गुंतागुंत असून आणि शरीराची ताकद कमी असूनही, प्रचंड मानसिक धैर्य दाखवणाऱ्या त्या रुग्णासाठीही हॅट्स ऑफ!

First published:

Tags: Chennai, Coronavirus, Kidney sell