कोरोनापासून वाचण्यासाठी प्यायले स्वत: बनवलेलं औषध आणि त्याच औषधाने घेतला जीव

कोरोनापासून वाचण्यासाठी प्यायले स्वत: बनवलेलं औषध आणि त्याच औषधाने घेतला जीव

चेन्नईतील (chennai) आयुर्वेदिक फार्मासिस्टनं इम्युनिटी वाढवण्यासाठी औषध तयार केलं आणि त्याच औषधामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

चेन्नई, 09 मे : जगभरातील शास्त्रज्ञांना कोरोनाव्हायरसविरोधातील (coronavirus) औषध (medicine) सापडलेलं नाही, अशात काही लोकं या व्हायरसपासून बचावासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. चेन्नईतील (chennai) आयुर्वेदिक फार्मासिस्ट आणि प्रोडक्शन मॅनेजरचा असाच एक प्रयोग महागात पडला आहे. त्यांनी एक केमिकलपासून औषध तयार केलं आणि ते प्यायल्यानंतर त्यांचा जीव गेला आहे.

द हिंदूनं दिलेल्या वृत्तानुसार, 47 वर्षांचे फार्मासिस्ट के. सिवानेसन चेन्नईतील सुजाता बायोटेकमध्ये काम करत होते. कंपनीचा एक प्लांट उत्तराखंडमधील काशापूरमध्ये आहे आणि ते तिथंच असत.  त्यांनी अनेक औषधांचा फॉर्म्युला तयार केला आहे आणि कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर राजकुमार यांना भेटण्यासाठी चेन्नईत येत असतं. यावेळी चेन्नईत आल्यानंतर लॉकडाऊनमुळे सिवानेसन चेन्नईतच अडकले.

हे वाचा - कोरोना रुग्णांच्या डिस्चार्ज नियमात बदल, आता 'या' अटींनुसार रुग्णालयातून सोडणार

सिवानेसन यांनी गुरुवारी एका केमिकलमार्फत औषध तयार केलं. सर्वात आधी त्यांनी राजकुमार यांना त्यांनी या औषधाची पावडर चाखायला दिली आणि राजकुमार बेशुद्ध झाले. त्यानंतर सिवानेसन ही पावडर पाण्यात मिसळून प्यायले आणि तेदेखील बेशुद्ध झालं. त्यांना तात्काळ टी नगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

इम्युनिटी वाढवण्यासाठी घेतलं औषध

कंपनीचे मीडिया मॅनेजर एनएस वासन यांनी सांगितलं की, "लॉकडाऊनमध्ये ते चेन्नईत अडकले होते. याच दरम्यान त्यांनी सांगितलं की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या एका भाषणात कोरोनाशी लढण्यासाठी औषध सांगितलं आहे. त्यानंतर सिवानेसन यांनी इम्युनिटी वाढवण्यासाठी बाजारातून केमिकल घेऊन आले आणि ते प्यायल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला"

"आम्ही आमच्या उत्पादनात अशा कोणत्याही केमिकलचा वापर करत नाही", असंही वासन यांनी सांगितलं.

संकलन, संपादन - प्रिया लाड

हे वाचा - आता तुम्हीही घरच्या घरी करू शकता Corona tets, व्हायरस पसरण्याचा धोकाही कमी होणार

First published: May 9, 2020, 4:08 PM IST

ताज्या बातम्या