'Swiggy'वरून मागवलेल्या जेवणात रक्त लागलेलं बॅण्डेज, ग्राहकाचा संताप

'Swiggy'वरून मागवलेल्या जेवणात रक्त लागलेलं बॅण्डेज, ग्राहकाचा संताप

चेन्नईतील एका ग्राहकानं स्विगी या वेबसाईटवरून जेवण मागवलं. अर्ध जेवण संपवल्यावर त्या जेवनात चक्क रक्त लागलेलं बॅण्डेज असल्याचं त्या ग्राहकाला कळालं.

  • Share this:

चेन्नई, 13 फेब्रुवारी : ऑनलाईन खरेदीचं प्रमाण अलीकडच्या काळात वाढलं आहे. अनेकजण आता जेवणही ऑनलाईनच ऑर्डर करतात. पण काहीवेळा तुमची ही सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. कारण ऑनलाईन मागवल्या जेवणात चक्क रक्त लागलेलं बॅण्डेज सापडल्याची घटना समोर आली आहे.

चेन्नईतील एका ग्राहकानं स्विगी या वेबसाईटवरून जेवण मागवलं. अर्ध जेवन संपवल्यावर त्या जेवणात चक्क रक्त लागलेलं बॅण्डेज असल्याचं त्या ग्राहकाला कळालं. बालामुरुगन दीनदयालन असं जेवण मागवणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर बालामुरुगन यांनी याबाबत रेस्टॉरंटकडे तक्रार केली. पण त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही.

'मी स्विगीवरून मागवलेल्या जेवणात रक्त लागलेलं बॅण्डेज सापडलं आहे. मी रेस्टॉरंटला याबाबत माहिती दिली पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यांना कॉल करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. आणि चॅटवर याबाबत त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही,' अशी फेसबुक पोस्ट बालामुरुगन यांनी लिहिलेली आहे.

स्विगीकडून माफी

या प्रकाराची सर्वत्र चर्चा झाल्यानंतर अखेर स्विगीने याबाबत माफी मागितली आहे. पण असं असलं तरीही संबंधित ग्राहकाने स्विगी आणि रेस्टॉरंटवर खटला दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे.

SPECIAL REPORT : तुमच्या केसांवर चीन वर्षाला किती कमावतो माहिती आहे का?

First published: February 13, 2019, 9:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading