Home /News /national /

केमिकल कंपनीत अग्नितांडव, भीषण स्फोटाने हादरला परिसर, LIVE VIDEO

केमिकल कंपनीत अग्नितांडव, भीषण स्फोटाने हादरला परिसर, LIVE VIDEO

सॉल्वेंट हा ज्वलनशील पदार्थ आहे. त्यामुळे आगीने आणखीच रौद्ररुपधारण केले आहे. त्यामुळे शेजारील असलेल्या कंपनीला सुद्धा आग लागली

    अहमदाबाद, 09 डिसेंबर : गुजरातमधील (Gujrat) अहमदाबाद जिल्ह्यात एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. रात्री 12  वाजेच्या सुमारास लागलेली  आग अद्याप विझली नाही. या दुर्घटनेत शेजारी असलेल्या आणखी 3 कंपन्यांनाही आग लागली आहे. आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. अहमदाबादमधील सॉल्वेंट बनवणाऱ्या मातंगी केमिकल कंपनीला रात्री  अचानक आग लागली. या कंनी सॉल्वेंट केमिकलचे ड्रम भरलले आहे, त्यामुळे अवघ्या काही क्षणात आगीने रौद्ररुपधारण केले. संपूर्ण केमिकल कंपनीही आगीच्या भस्मस्थानी सापडली आहे.  केमिकलने भरलेल्या ड्रममुळे एकापाठोपाठ स्फोटांचे आवाज येत आहे. स्फोटांच्या आवाजांनी परिसर दणाणून गेला आहे. सॉल्वेंट हा ज्वलनशील पदार्थ आहे. त्यामुळे आगीने आणखीच रौद्ररुपधारण केले आहे. त्यामुळे शेजारील असलेल्या कंपनीला सुद्धा आग लागली आहे. सुदैवाने रात्रपाळी असल्यामुळे बरेच कामगार हे हजर नव्हते. त्यामुळे या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या 40 गाड्या दाखल झाल्या आहेत. पण, अजूनही आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले नाही. मातंगी केमिकल कंपनीला लागलेल्या आग शेजारील असलेल्या 3 कंपन्यांमध्ये पसरली आहे. या दुर्घटनेत तिन्ही कंपन्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या