करुन दाखवलं! भारताने तयार केली स्वस्त कोरोना चाचणी किट; अवघ्या काही मिनिटांत देणार रिझल्ट

करुन दाखवलं! भारताने तयार केली स्वस्त कोरोना चाचणी किट; अवघ्या काही मिनिटांत देणार रिझल्ट

स्वस्त कोरोना किट तयार केल्यामुळे सर्वांनाच चाचणी करता येईल. यातूनही कोरोना रुग्णाच्या संख्येवर नियंत्रण आणणे सोपे जाईल

  • Share this:

नवी दिल्ली, 6 जून : देशभरात कोरोनाने (Coronavirus) हाहाकार माजवला आहे. त्यात कोरोना चाचणीसाठी पुरेसे किट नसणे आणि दुस़रीकडे खासगी रुग्णालयातून चाचणीसाठी हजारो रुपये उकळत असल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. अशातच एक सकारात्मक बातमी समोर आली आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबाद (IIT -हैदराबाद) च्या संशोधकांनी असा कोविड – 19 चाचणीसाठी एक किट विकसित केली आहे, ज्याचा परिणाम अवघ्या २० मिनिटांत होईल, असा त्यांचा दावा आहे. त्यांच्याद्वारे विकसित केलेले कोविड - 19 टेस्टिंग किट सध्या वापरल्या जाणार्‍या रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिएक्शन (आरटी-पीसीआर) वर आधारित नाही.

संशोधकांनी सांगितले की हे किट 550 रुपये किंमतीने विकसित केले गेले असून मोठ्या संख्येने उत्पादन केल्यास याची किंमत 350 रुपयांपर्यंत असू शकते.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) कडून मागितली परवानगी

हैदराबादच्या ईएसआयसी मेडिकल कॉलेज व इस्पितळात चाचणी किटच्या  पेटंटसाठी संशोधकांनी अर्ज केला आहे आणि क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत.  भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) कडे परवानगी मागण्यात आली आहे.

आयआयटी हैदराबाद येथील विद्युत अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक शिव गोविंद सिंह म्हणाले, “आम्ही कोविड -19 चाचणी किट विकसित केली आहे, जी 20 मिनिटांत लक्षणं असलेल्या व नसलेल्या रुग्णांच्या चाचणी अहवाल देईल. याचे  वैशिष्ट्य म्हणजे ते आरटी-पीसीआरसारखे कार्य करते. '

आयआयटी हैदराबादची कोरोना किट विकसित करणारी दुसरी संस्था

प्रोफेसर सिंग म्हणाले, "कमी किंमतीची ही चाचणी किट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे नेली जाऊ शकते आणि रुग्णाच्या घरी त्याची चाचणी केली जाऊ शकते. सध्याच्या चाचणी प्रणालीचा पर्याय म्हणून ही चाचणी किट वापरली जाऊ शकते. आम्ही कोविड - 19 जीनोमच्या संरक्षित प्रदेशांचा विशिष्ट क्रम शोधला आहे. "

हे वाचा-संशयास्पद अवस्थेत आढळला इन्स्पेक्टरचा मृतदेह, दिल्ली दंगलीचा करीत होते तपास

 

First published: June 6, 2020, 11:05 PM IST

ताज्या बातम्या