मराठी बातम्या /बातम्या /देश /Chaupal 2023: पंतप्रधान मोदींना 2024 ला कोण हरवू शकतं? नितीन गडकरींनी एका वाक्यात दिले उत्तर

Chaupal 2023: पंतप्रधान मोदींना 2024 ला कोण हरवू शकतं? नितीन गडकरींनी एका वाक्यात दिले उत्तर

न्यूज18 इंडियाच्या 'चौपाल' कार्यक्रमात नितीन गडकरी उपस्थितीत होते

न्यूज18 इंडियाच्या 'चौपाल' कार्यक्रमात नितीन गडकरी उपस्थितीत होते

'माझ्याकडे असलेल्या खात्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही, संपूर्णपणे पारदर्शक अशी व्यवस्था केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 20 मार्च : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी रणनीती आखली जात आहे. पण, 'क्रिकेट, बिझनेस आणि राजकारणात काहीही होऊ शकतं, मात्र चांगल्या कामामुळे जनता आमच्यासोबत आहे' अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं.

न्यूज18 इंडियाच्या 'चौपाल' कार्यक्रमात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं.

2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींना कुणीही पराभूत करू शकत नाही, असा सवाल केला असता गडकरी म्हणाले की, 'क्रिकेट, व्यवसाय आणि राजकारणात काहीही होऊ शकते, मात्र चांगल्या कामामुळे जनता आमच्यासोबत आहे. मोदी सरकारने प्रत्येक क्षेत्रात चांगले काम केले आहे, देशात झालेला बदल हा सरकारच्या कामाचा पुरावा आहे' अशी प्रतिक्रिया नितीन गडकरींनी दिली.

('कुठेही इगो न ठेवता..' सरकारी कर्माचाऱ्यांचा संप मिटल्यानंतर फडणवीसांचे महत्त्वाचे निवेदन)

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, 2014 पासून आजपर्यंत सरकार आल्यावर 50 लाख कोटींची कामं केली आहे. अजूनीही काम सुरू आहे. मात्र आमच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. ज्या उणिवा राहिल्या आहेत त्या सहकार्याने आणि समन्वयाने सोडवल्या जातात त्यामुळे सर्व कामं सहज होतात, असंही गडकरी म्हणाले.

(Chaupal 2023 : रेल्वेचं खासगीकरण होणार का? खुद्द रेल्वे मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं)

'माझ्याकडे असलेल्या खात्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही, संपूर्णपणे पारदर्शक अशी व्यवस्था केली आहे. आर्थिक ऑडिट हे अत्यंत महत्त्वाचे असले तरी कामाची क्षमताही त्यापेक्षा महत्त्वाची आहे. म्हणजे ऑडिट हे खूप महत्वाचे आहे आणि त्याच वेळी परफॉर्मन्स ऑडिट देखील जास्त महत्वाचे आहे' असंही गडकरी म्हणाले.

यावेळी त्यांनी दिल्लीतील पहिला रिंग रोडचा उल्लेख केला. 'पूर्वी दिल्लीत रिंगरोड होता तो द्वारकामध्ये येतो. ते त्यांचं काम नव्हतं, खासदार परवेश वर्मा यांच्या विनंतीवरून बैठक बोलावली आणि काम पूर्ण करण्यात आलं. दोन दिवसांपूर्वी ते गेले तेव्हा आनंद झाला, तो रस्ता आता पूर्ण झाला आहे, आता 2 तासाच्या वेळेत 20 मिनिटे लागतात, असंही गडकरींनी सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Nitin gadkari