रायपूर, 13 मार्च : तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी अनेक उपक्रम आयोजित केले जातात. पण प्रत्यक्षात फार थोड्यांना समान संधी मिळते आणि प्रतिष्ठेचं काम करायला मिळतं. पण छत्तीसगढ पोलिसांनी खरोखर इतिहास घडवला आहे. समाजातील संधी आणि प्रतिष्ठा नसलेल्या एका गटाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सुरू केलेले प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहेत. (13 Transgenders in Chhattisgarh Police )
तृतीयपंथी समाज हा कायमच उपेक्षित राहत आलेला आहे. मात्र छत्तीसगड पोलिसांनी आता तृतीयपंथीयांना पोलीस दलात संधी देऊ केली आहे. 13 तृतीयपंथी आता पोलीस कॉन्स्टेबल बनणार आहेत. (chattisgarh police)
मागच्या सोमवारी छत्तीसगढच्या पोलीस भरतीचा निकाल जाहीर झाला. यात 2 हजार 259 पदांवर सगळ्या राज्यांतून उमेदवारांची निवड झाली आहे. कदाचित हे देशातील पाहिलं राज्य आहे जिथं इतक्या संख्येनं तृतीयपंथी उमेदवार पोलीस दलात सहभागी करून घेतले गेले आहेत. (chattisgarh police news)
पोलीस दलात मिळालेल्या संधीनं उपजीविकेच्या साधनासह प्रतिष्ठा मिळाल्यानं तृतीयपंथी समूहात आनंदाचं वातावरण आहे. निवड झालेल्या उमेदवारांपैकी एक सोनिया म्हणते, 'ही एक मोठीच संधी आहे.
हेही वाचा आईच्या गोड Kiss चा चमत्कार; टळली बाळासोबत होणारी मोठी दुर्घटना; पाहा VIDEO
आम्ही पोलीस विभागाला धन्यवाद देऊ इच्छितो. या पोलीस दलाच्या पुढाकारानं आमच्या समाजाकडे पाहण्याची लोकांची दृष्टी बदलेल. (transgender candidates going to be police constables)
Chhattisgarh Police has recruited 13 transgender persons as constables
This is a big opportunity & we'd like to thank the Police Dept. This initiative will bring about a change in the way people view our community: Sonia, one of the transgender persons recruited as a constable pic.twitter.com/Gh6mBqs7TA — ANI (@ANI) March 13, 2021
छत्तीसगढमध्ये निवड झालेल्या तृतीयपंथी उमेदवारांमध्ये रायपूरची दीपिका यादव, निशू क्षत्रिय, शिवन्या पटेल, नैना सोरी, सोनिया जंघेल, कृषी तांडी आणि सबुरी यादव आहे.
हेही वाचा भय्यू महाराज प्रकरणी खळबळजनक खुलासा! गाडीत लावलेली होती गुप्त यंत्रणा
सोबतच बिलासपूर इथून सुनील आणि रुची यादव, धमतरी जिल्ह्यातून कोमल साहू, अंबिकापूर इथून अक्षरा, राजनांदगाव जिल्ह्यातून कामता, नेहा आणि डोली यांचीही निवड झाली आहे. (chattisgarh police selected transgenders)
आलेल्या निकालात निवड झालेले पुरुष उमेदवार 1736, महिला उमेदवार 289 आणि तृतीयपंथी उमेदवार 13 आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chattisgarh