मराठी बातम्या /बातम्या /देश /

माजी मुख्यमंत्र्यांची प्रकृती चिंताजनक; ऑडिओ थेरेपीनंतर डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

माजी मुख्यमंत्र्यांची प्रकृती चिंताजनक; ऑडिओ थेरेपीनंतर डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

छत्तीसगडचे (Chhattisgarh) माजी मुख्यमंत्री अजित जोगी (Ajit jogi) यांच्या आरोग्याबाबत रुग्णालय प्रशासनानं हेल्थ बुलेटिन जारी केलं आहे.

  • Published by:  Priya Lad
देवव्रत भगत/रायपूर 14 मे : छत्तीसगडचे (Chhattisgarh) माजी मुख्यमंत्री अजित जोगी (Ajit jogi) कोमात आहे. त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी ऑडिओ थेरेपी दिली जात आहे. त्यानंतर आज त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. अजित जोगी यांच्या बोटाची हालचाल झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. रायपूरच्या श्री नारायणा रुग्णालयानं गुरुवारी सकाळी अजित जोगींचं  सातवं हेल्थ बुलेटिन जारी केलं. जोगी यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याची हालचाल झाल्याचं त्यात सांगण्यात आलं आहे. त्यावेळी त्यांचे पुत्र अमित जोगीही तिथं होते. हे वाचा - कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय श्री नारायणा रुग्णालयाचे संचालक डॉ. सुनील खेमका यांच्या हवाल्यानं जारी करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये 74 वर्षीय अजित जोगींची प्रकृती मात्र आधीप्रमाणेच आहे, असं सांगण्यात आलं आहे. त्यांच्या मेंदूतील कार्य खूपच कमी आहे. ब्लड प्रेशर, हृदय, आणि युरिन आऊटपूट नियंत्रणात आहे. त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. हार्ट अटॅक आल्यानं 9 मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हे वाचा - कोरोनाग्रस्तांसाठी विशेष आहार; Healthy diet ने रुग्ण करत आहेत व्हायरसवर मात मंगळवारी डॉ. सुनील खेमका यांनी सांगितलं होतं की, अजित जोगींच्या मेंदूला कार्यरत करण्यासाठी रुग्णालयात त्यांना ऑडिओ थेरेपी दिली जात आहे. याअंतर्गत त्यांना त्यांची आवडती गाणी ऐकवली जात आहे. या थेरेपीनंतर त्यांच्या प्रकृतीत अंशत: सुधारणा झाली आहे. त्यांच्या मेंदूतही थोडी हालचाल पाहायला मिळते आहे. मात्र तरीही त्यांची प्रकृती अज्याप गंभीर असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं. अजित जोगी हे काँग्रेसचे खंदे नेते आहेत, पण काही काळापूर्वी झालेल्या अपघातात त्यांचा पाय अधू झाला होता. तेव्हापासून जोगी व्हीलचेअरवर आहेत. संपादन - प्रिया लाड
First published:

Tags: Chattisgarh, Health

पुढील बातम्या