Home /News /national /

गाडीच्या हौसेपोटी जन्मदातीला गमावलं, टेस्ट ड्राईव्ह करताना आई-बापाला चिरडलं

गाडीच्या हौसेपोटी जन्मदातीला गमावलं, टेस्ट ड्राईव्ह करताना आई-बापाला चिरडलं

एका चुकीमुळे आपल्या डोळ्यांदेखत मुलाला आपल्या आईला गमवावे लागले.

    चांपा (छत्तीसगढ), 26 जानेवारी : छत्तीसगडच्या जांजगीर येथे धक्कादायक प्रकार घडला. येथे एक मुलाने टेस्ट ड्राईव्ह करत असताना आपल्याच आई-बाबांच्या अंगावर गाडी घातली. मुलगा गाडी शिकत असताना त्याचे आई-बाबासोबतच होते. मात्र मुलाने अचानक गाडीचा वेग वाढवला आणि त्याला नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळं रस्त्यालगत असलेल्या आपल्याच पालकांवर त्याने गाडी चढवली. या भयंकर अपघातात त्याच्या आईचा जागीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले. वाचा-कंगना रणौत ते अदनान सामीसह 'या' बॉलिवूड कलाकारांना पद्मश्री पुरस्कार जाहीर दरम्यान, साक्षीदारांनी तातडीने दोन्ही जखमींना बाहेर काढले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले. मुलाच्या वडिलांची प्रकृतीही गंभीर आहे. मुलाला गाडीवर नियंत्रण न ठेवता आल्यामुळं गाडीच्या चाकाखाली आई-बाबा आले. दरम्यान, पोलिसांनी आरोपी मुलाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. परंतु, त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. असे म्हटले जाते की आरोपी मुलगा ड्रायव्हिंगचा शौकीन आहे, परंतु त्याने ना ड्राईव्हिंग शिकला आहे ना त्याला गाडीविषयी अधिक माहिती होती. वाचा-गुगलवरून नंबर घेऊन बैलासाठी मागितली मदत आणि... या घटनेमुळे जांजगीरच्या राहौद गावात शोक पसरला आहे. येथे मार्शल जीपच्या ड्रायव्हिंग सीटवर आपले कौशल्य दाखवण्यासाठी हा मुलगा बसला होता. मात्र त्याने अचानक गाडीचा स्पीड वाढवल्यामुळं पालकांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात आईचा जागीच मृत्यू झाला तर वडिल गंभीर जखमी आहेत. त्यांना बिलासपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शिवरिनारायण पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडली. वाचा-सेजल शर्मा आत्महत्या प्रकरण: संशयाची सुई बॉयफ्रेंडवर, कुटुंबीयांची चौकशीची मागणी
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या