नवी दिल्ली, 03 डिसेंबर : प्यार मे धोका मिळाल्यानं तरुणीनं आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेनं एक दिवस आधी व्हिडीओ तयार करून महिलेनं स्वत: जिवंत जाळून घेतल्याची घटना समोर आली आणि एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत महिला कलाकार पुष्पा बेहरा गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या मेकाहारा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोरोना काळात काम मिळालं नाही म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा होती बुधवारी या महिलेचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. या व्हिडीओमधून महिलेनं कारण सांगितलं आहे. आपल्या प्रियकरानं आपल्याला फसवलं आणि लग्नाचं खोटं आमिष दाखवलं. प्रियकराकडून समाजात होणाऱ्या बदनामीमुळे आणि लग्नचं वचन मोडल्यानं हे पाऊल उचलल्याचं या व्हिडीओमध्ये महिलेनं सांगितलं आहे. ही धक्कादायक घटना छत्तीसगड जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जात आहे.
आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी एक दिवस आधी प्रियकर तिच्या घरी आला होता. त्याने घरात तोडफोड करत महिलेवर गंभीर आरोपही लावले. ज्या तरुणावर मी मनापासून प्रेम करत होते त्याने माझ्या घरी येऊन तोडफोड केली आणि सगळ्या वस्तू जाळून टाकल्या. मला देखील त्याने खूप मारहाण केली आणि बदनाम करण्याची भीती घातली. वाईट आणि घाणेरडे आरोप केले मला फक्त न्याय हवा आहे असं या महिलेनं या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं.
माझी बदनामी केली जात आहे. सगळं काही सहन करू शकते पण बदनामी नाही त्यामुळे मी माझं आयुष्य संपवत आहे मला फक्त न्याय मिळावा ही शेवटची इच्छा असल्याचा उल्लेख या व्हिडीओमध्ये केल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेनं स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आणि मोठी खळबळ उडाली.
या प्रकरणी पोलीस ठाण्यात तरुण मोहन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेचे नातेवाईक आणि तरुण तिला तिचा जबाब बदलण्यासाठी दबाव टाकत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी