बापरे! महापुरामुळे वाघाचा शेळ्यांच्या गोठ्यात मुक्काम, दार उघडताच दिसलं विश्वास न बसणारं दृश्य

बापरे! महापुरामुळे वाघाचा शेळ्यांच्या गोठ्यात मुक्काम, दार उघडताच दिसलं विश्वास न बसणारं दृश्य

वाघ पाहिल्यानंतर त्या घाबरून घरात पळाल्या. काही वेळ त्यांना काहीच सूचत नव्हतं. दरदरून घामही फुटला होता.

  • Share this:

गुवाहाटी 14 जुलै: मुसळधार पावसामुळे आसममध्ये (Assam) सध्या महापूर आला आहे. गोलाघाट जिल्ह्याला(Golaghat District) त्याला मोठा फटका बसला. याच जिल्ह्याला लागून असलेल्या काझिरंगा अभयारण्यातही (Kaziranga National Park)  आता पाणी घुसलं असून तिथे राहणाऱ्या प्राण्यांना मोठा फटका बसला आहे. याच महापूरातून वाचण्यासाठी एका वाघाने चक्क शेळ्यांच्या गोठ्यात आश्रय घेतला. सकाळी जेव्हा मालकिनीने गोठ्याचं दार उघडलं तेव्हा ती घाबरून धावतच सुटली. मात्र थकलेल्या या वाघाने कुणावरही हल्ला केला नाही.

कंधुलिमारी गावात ही घटना घडली आहे. महापूरात अडकलेल्या वाघाने आपली सुटका केली आणि शेजारच्या गावात तो घुसला. तिथल्या कमल शर्मा यांच्या घराच्या परिसरात असलेल्या शेळ्यांच्या गोठ्यात तो घुसला. त्यावेळी तिथे शेळ्याही होत्या.

गोठ्यात चारा ठेवलेल्या पेंढ्यांमध्ये तो जाऊन बसला होता. सकाळी कमल शर्मा जेव्हा गोठ्याचं दार उघडून त्या चारा टाकू लागल्या तेव्हा त्यांच्या हाताला काही तरी लागलं. त्यांनी जेव्हा चारा हटवून पाहिलं तेव्हा त्या प्रचंड घाबरल्या. कारण एक वाघ तिथे बसलेला होता.

कोरोना लशींवर जगभरात संशोधन; कितपत मिळालं यश?

वाघ पाहिल्यानंतर त्या घाबरून घरात आल्या. काही वेळ त्यांना काहीच सूचत नव्हतं. दरदरून घामही फुटला होता. पण पुराच्या पाण्यातून बाहेर येताना त्याची प्रचंड शक्ती खर्च झाली होती. त्यामुळे तो कमालीचा थकला होता. हल्ला करण्याचीही त्याच्यात शक्ती राहिली नसावी असं मत कमल शर्मा यांनी व्यक्त केलं.

नेकलेस कम गोल्डन मास्क; असा MASK जो तुम्ही आयुष्यभर घालायला तयार व्हाल

त्यामुळे रात्रभर गोठ्यात राहूनही त्याने शेळ्यांवर किंवा माणसांवरही हल्ला केला नाही. नंतर काही वेळांनी लोकांनी त्याला तिथून हुसकावून लावलं. नंतर तो वाघ शेजारच्या जंगलात गेला.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 14, 2020, 8:48 PM IST
Tags: Floodtiger

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading