प्रदीप साहू
चरखी दादरी, 27 एप्रिल : कोरोनाला रोखण्यासाठी भारतात 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळं कामासाठी परराज्यात असलेले हजारो लोकं अडकले आहे. आपल्या घरी जाण्यासाठी मिळेल त्या मार्गाने प्रवास करत घर गाठत आहेत. काहींनी पायी प्रवासाला सुरुवात केली आहे, तर काही अजूनही लॉकडाऊन संपण्याची वाट पाहत आहेत. अशातच एका रंगकर्मीनं आजारी आईला भेटण्यासाठी चक्क सायकलवरून मुंबई ते दादरी असा 1400 किमीचा प्रवास केला.
दादरा येथील संजय रामफळ सुमारे तीन महिन्यांपूर्वी मुंबईत एका चित्रपटाच्या ऑडिशनकरिता आला होता. मात्र कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर संजय मुंबईतच अडकला. याच काळात त्याला घरून फोन आला आणि आई आजारी असल्याचं कळलं. मुंबईत त्याचा जीव लागत नसल्यामुळं त्यानं आईला भेटण्यासाठी घर गाठण्याचा निश्चय केला. मात्र घरी परतण्यासाठी काहीच सोय नसल्यामुळं अखेर त्यानं एक जुनी सायकल खरेदी केली. जुनी सायकल विकत घेतल्यानंतर तो आपल्या आईला भेटण्याच्या इच्छेनं घराकडं निघाला. वाटेत बर्याच अडचणींचा सामना करावा लागला, पण आईला भेटण्याची इच्छ एवढी प्रग्लभ होती की त्यानं तब्बल 1400 किमीचा प्रवास केला. 16 दिवस सायकल चालवल्यानंतर संजय आपल्या घरी पोहचला.
वाचा-Coronavirus: कोरोनाच्या वॅक्सिनसाठी संपूर्ण जगाला भारताकडून आशा, कारण...
चरखी दादरी येथील रहिवासी रंगकर्मी संजय रामफळ यानी मुंबईहून सायकलवरून आपलं घर गाठलं. दादरीला येताच संजयने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणी केली. यावेळी, डॉक्टरांनी त्याला 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये रहाण्याचा सल्ला दिला आहे. हॉस्पिटलमधून संजय थेट घरी गेला आणि आईची भेट घेतली. याबाबत संजयने सांगितले की, "तीन महिन्यांपूर्वी तो एका मोठ्या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मुंबईला आला होता. अंतिम ऑडिशननंतर जेव्हा तो घरी येणार होता, तेव्हा लॉकडाउन देशात लागू करण्यात आला. तर, दुसरीकडे आई आजारी असल्याचे घरून फोन येत होते. त्यावेळी मनात फक्त आईला भेटण्याची इच्छा होता. कसलाही विचार न करता मी सायकलवरून घर गाठण्याचा विचार केला". तब्बल 16 दिवस रात्रंदिवस सायकल चालवल्यानंतर संजय घरी पोहचला.
वाचा-लॉकडाऊन हटवण्याआधी करा 'ही' तयारी, WHOने सर्व देशांना दिल्या सूचना
प्रवासादरम्यान अनेक अडचणींचा केला सामना
संजयने सांगितले की तो दररोज सुमारे 80 ते 90 किमी सायकलवर प्रवास करत होता. यादरम्यान, त्याला पोलिसांच्या नाकाबंदीसह अनेक खडबडीत मार्गांनी घर गाठावे लागेल. या प्रवासादरम्यान मध्येच त्याच्या सायकलचे चाकही खराब झाले होते. त्यानंतर त्यानं जुनी सायकल खरेदी करून तो दादरीला पोहचला. सध्या संजय यांना क्वारंटाइन राहण्याचा सल्ल देण्यात आला आहे. दरम्यान घरी घरी आल्यावर आईला भेटून खूप आनंद झाला असल्याचं संजयनं सांगितलं.
वाचा-'मी जिवंत आहे', डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या कोरोना रुग्णाचा धक्कादायक VIDEO
संपादन-प्रियांका गावडे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.