झाकीर नाईकविरूद्ध आरोपपत्र दाखल

झाकीर नाईकविरूद्ध  आरोपपत्र दाखल

एनआयए कोर्टात हे ५० पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

  • Share this:

26 ऑक्टोबर: वादग्रस्त धर्मगुरू झकीर नाईक विरोधात आज आरोपपत्र दाखल झालं आहे. एनआयए कोर्टात हे ५० पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

झाकीर नाईक गेल्या अनेक महिन्यांपासून फरार आहे. त्याने सौदी अरेबियात आश्रय घेतला आहे. धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे, भारताविरोधात युद्ध छेडणे, राष्ट्रविरोधी कारवाई करण्यासाठी पैसा वळवणे. अशाप्रकारचे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. एनआयएनं एकूण ८५ जणांचे जबाब नोंदवले आहेत, ज्यामध्ये झकीरची सख्खी बहीण नाईला नूरानी यांचाही समावेश आहे. नाईलाजाने झकीरविरूद्ध जबाब दिला आहे.याशिवाय अनेक पुरावे देखील झकीर नाईकविरूद्ध एनआयएकडे आहेत.

त्यामुळे झाकीर नाईकला अटक करण्यासाठी सरकार काय पाऊलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: October 26, 2017, 11:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading