चप्पलवाल्या 'त्या' सेल्फीबद्दल अमिताभ बच्चन यांना 'ही' शंका

चप्पलवाल्या 'त्या' सेल्फीबद्दल अमिताभ बच्चन यांना 'ही' शंका

सध्या सोशल मीडियावर पाच मुलांच्या चप्पलवाल्या सेल्फीची चर्चा जोरात सुरू आहे. पम, बीग बि अमिताभ बच्चन यांनी मात्र यावर शंका घेतली आहे.

  • Share this:

मुंबई 4 फेब्रुवारी : सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या जगातील अनेक गोष्टी अगदी सेकंदामध्ये व्हायरल होत आहेत. अनेक जण या सोशल मीडियामुळे एका रात्रीत स्टार देखील झाले आहेत. सध्या अशाच प्रकारचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यामध्ये पाच मुलं हातात चप्पल घेऊन सेल्फी काढताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात या फोटोला लाईक्स आणि शेअर देखील मिळत आहेत. अगदी सेलिब्रेटींना देखील याचा मोह सुटला नाही.

बोमन इराणी, अमिताभ बच्चन, सुनील शेट्टी यांनी देखील या फोटोची दखल घेतली आहे. अनेकांनी इन्टाग्राम आणि ट्विटरवर हा फोटो अपलोड केला आहे.

बिग बींना 'त्या' फोटोबद्दल शंका

फेमस फोटोग्राफर अतुल कसबेकरनं तर चप्पलच्या साथीनं सेल्फी घेणाऱ्या त्या पाच मुलांचा फोटो ट्विट करत मला त्यांना गिफ्ट द्यायचं आहे अशी भावना व्यक्त केली आहे. कसबेकरच्या या ट्वीटला अमिताभ बच्चन यांनी ही फोटोशॉपची तर कमाल नाही ना? असा सवाल केला आहे.

चप्पलची साईज तसंच मुलाचा हात खरा वाटत नाही मॉर्फ केलेला वाटतो, असं म्हटलं आहे. बीग बिंनी शंका घेतल्यानंतर अतुल कसबेकरनं देखील त्यांना हा फोटो फेक नसून त्याची सत्यता @HappyFinishAsiaनं पडताळली असल्याचं म्हटलं आहे.

कुणाला या फोटोबद्दल शंका देखील असतील 'पण, बॉस ये फोटो दिल को छू गया है' हे मात्र नक्की!

First published: February 4, 2019, 10:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading