कॉलेजचं नामकरण 'वंदे मातरम' केलं म्हणून दिली जिवे मारण्याची धमकी

कॉलेजचं नामकरण 'वंदे मातरम' केलं म्हणून दिली जिवे मारण्याची धमकी

त्यानंतर कॉलेजच्या गव्हर्निंग बॉडीचे अध्यक्ष असलेल्या अमिताभ सिन्हा यांना जिवे मारण्याची धमकी दिली जाते आहे. यासंदर्भात सिन्हा यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.

  • Share this:

दिल्ली, 24 नोव्हेंबर: दिल्लीच्या दयाल सिंह कॉलेजचं नाव बदलून वंदे मातरम कॉलेज ठेवलं गेल्याचा मुद्दा अधिकच वादग्रस्त होत चालला आहे. कॉलेजचं नामकरण वंदे मातरम केलं म्हणून कॉलेजच्या गव्हर्निंग बॉडी प्रमुखाला जिवे मारण्याची धमकी दिली जाते आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीतल्या जुन्या दयाल सिंह कॉलेजचं नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यानंतर कॉलेजच्या गव्हर्निंग बॉडीचे अध्यक्ष असलेल्या अमिताभ सिन्हा यांना जिवे मारण्याची धमकी दिली जाते आहे. यासंदर्भात सिन्हा यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.

त्यानुसार नाव बदलल्याचा निर्णय घेतल्यानंतर काही विशिष्ट समाजाचे लोकांनी त्यांना कॉल केला  आणि कॉलेजचं नाव का बदललं असे प्रश्न विचारले. तसंच जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या.

सूत्रांच्या माहितीनुसार शिख समुदायाचा या निर्णयाला विरोध होताय. अकाली दलच्या कार्यकर्त्यांचा या नामकरणला विरोध  आहे. त्यांच्यानुसार दयाल सिंह यांनी ट्रस्ट बनवून या कॉलेजची स्थापना केली होती.त्यामुळे या कॉलेजचं नाव बदलणं योग्य नाही. या कॉलेजला दयाल सिंहच असलं  पाहिजे  अशी  अकाली दलची मागणी आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2017 05:49 PM IST

ताज्या बातम्या