येत्या रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार ; 4 मंत्र्यांनी दिले राजीनामे

येत्या रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार ; 4 मंत्र्यांनी दिले राजीनामे

आतापर्यंत राजीव प्रताप रुडी, फग्गनसिंग कुलस्ते, संजीव बनियान आणि महेंद्र पांडे या मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. तर उमा भारतींसह आणखी काही मंत्र्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

  • Share this:

31 आॅगस्ट : केंद्रीय मंत्रिमंडळाचा येत्या रविवारी विस्तार होणार आहे. विस्तारादरम्यान मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर 4 मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत तर काहींनी राजीनामे देण्याची तयारी दर्शवली आहे.

आतापर्यंत राजीव प्रताप रुडी, फग्गनसिंग कुलस्ते, महेंद्र पांडे आणि संजीव बलियान या चार मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. भाजपचे संघटन मंत्री रामलाल यांच्याकडे त्यांनी हे राजीमाने देऊ केलेत. उमा भारतींनीही प्रकृतीचं कारण देत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. तर गेल्या काही काळातल्या वाढत्या रेल्वे दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सुरेश प्रभूंनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. पण मोदींनी त्यावेळी त्यांनी थोडं थांबा असं सांगितलं होतं. त्यामुळे या फेरबदलात त्यांचंही रेल्वेमंत्रिपद बदललं जाऊ शकतं. याशिवाय गिरीराज सिंग, कलराज मिश्रा, निर्मला सीतारामन हेही मंत्री राजीनामे देऊ शकतात. त्यांच्यावर पक्ष संघटनेची जबाबदारी दिली जाऊ शकते.

रेल्वे खात्याचा अतिरिक्त भार नितीन गडकरींकडे जाण्याची शक्यता आहे. तसंच अरुण जेटलींकडून संरक्षण खातं काढलं जाणार, अशी माहिती मिळतेय. यामुळे देशाला पूर्ण वेळ संरक्षणमंत्री मिळणार असं दिसतंय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2017 02:28 PM IST

ताज्या बातम्या