जवान चंदू चव्हाण कोर्ट मार्शलमध्ये दोषी

जवान चंदू चव्हाण कोर्ट मार्शलमध्ये दोषी

चव्हाण यांचा आपल्या वरिष्ठांशी वाद झाला, आणि रागाच्या भरात ते चालू लागले. त्यांनी एलओसी कधी ओलांडली, हे त्यांच्याही लक्षात आलं नाही.

  • Share this:

26 आॅक्टोबर : मूळचे महाराष्ट्राचे असलेले जवान चंदू चव्हाण यांना कोर्ट मार्शलमध्ये दोषी ठरवण्यात आलंय. सर्जिकल स्ट्राईकदरम्यान चंदू चव्हाण एलओसी ओलांडून पाकिस्तानमध्ये गेले होते. या प्रकरणी त्यांना २ महिने २९ दिवसांचा तुरुंगवास आणि २ वर्षांची पेंशन कापण्यात येणार आहे.

चव्हाण यांचा आपल्या वरिष्ठांशी वाद झाला, आणि रागाच्या भरात ते चालू लागले. त्यांनी एलओसी कधी ओलांडली, हे त्यांच्याही लक्षात आलं नाही. अनेक दिवस ते पाकिस्तानच्या कब्ज्यात होते. पण दोन्ही देश याबाबत सतत संपर्कात राहिले, आणि सुदैवानं चव्हाण परत आले.

त्यांच्या आजीनं मात्र हाय खाल्ली आणि ते परत येण्याआधीच आजींचं निधन झालं.

First published: October 26, 2017, 12:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading