'विक्रम'चे फोटो टिपण्यात NASA अपयशी, सांगितलं काय झालं?

'विक्रम'चे फोटो टिपण्यात NASA अपयशी, सांगितलं काय झालं?

इस्रोनं विक्रमशी संपर्क करण्यासाठी अमेरिकन अंतराळ संस्था नासाची मदत घेतली. मात्र, आता अखेरच्या आशाही जवळपास संपुष्टात आल्या आहेत.

  • Share this:

बेंगळुरू, 19 सप्टेंबर : भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेतील लँडर विक्रमने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हार्ड लँडिंग केलं होतं. यामुळं एक थ्रस्टर काम करत नाही. याचा परिणाम म्हणून विक्रमचा इस्रोशी संपर्क तुटला. हा संपर्क होण्यासाठी इस्रोनं अनेक प्रयत्न केले. अखेर अमेरिकन अंतराळ संस्था नासाची मदत घेण्यात आली. मात्र नासाचा ऑर्बिटरदेखील लँडर विक्रमचे फोटो घेऊ शकला नाही.

विक्रमशी संपर्क होण्याच्या अखेरच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. इस्रोच्या शास्त्रज्ञांनीदेखील विक्रम पुन्हा संपर्कात येण्याची आशा सोडली आहे. या मोहिमेत भारताच्या आशा नासावर होत्या. मात्र त्यांच्याकडूनही काही होऊ शकलं नाही. नासाच्या ऑर्बिटरला लँडर विक्रमचे फोटो काढण्यात अपयश आलं आहे.

6 सप्टेंबरला चांद्रयान 2 चा लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरला. मात्र हार्ड लँडिंगमुळे एक थ्रस्टर खराब झाला. विक्रमचा संपर्क तुटला असून आता चंद्रावर लूनार डे संपल्यानंतर अंधार पडला आहे. अंधारामुळे विक्रमचे फोटोही काढता येत नाहीत.

दोन दिवसांपूर्वी नासाचा सॅटेलाइट एलआरओ सध्या चंद्राभोवती फिरत आहे. बुधवारी तो चंद्रावर जिथं विक्रम पडला तिथं पोहचेल. मात्र नासाने म्हटलं आहे की, विक्रम त्यांच्या ऑर्बिटरच्या कॅमेऱ्यात टिपू शकत नाही.

एव्हिएशन वीकने म्हटल्यानुसार, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर विक्रम जिथं पडला आहे तिथं सावली पडली आहे. यामुळं कॅमेऱ्यात तिथले दृष्य टिपता आले नाही. चंद्रावर दोन आठवड्यांनी पुन्हा रात्र होणार आहे. त्यामुळे अनेक भागात सावली पडली आहे.

इस्रोनं चांद्रयान 2 साठी देशासह जगभरातून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानलं आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं की, विक्रमशी संपर्क तुटल्यानं फक्त 5 टक्के मोहिमेवर परिणाम झाला आहे. 95 टक्के भाग काम करत राहिल. चंद्राच्या कक्षेत असलेल्या ऑर्बिटरच्या माध्यमातून माहिती मिळत राहिल असंही स्पष्ट केलं होतं.

VIDEO: युती तुटणार? फॉर्म्युल्याबाबत शिवसेनेचे संजय राऊत म्हणतात

First published: September 19, 2019, 1:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading