चांद्रयान 2 नंतर Chandrayaan 3 या मोहिमेसाठी इस्रोचा मोठा निर्णय!

चांद्रयान 2 नंतर Chandrayaan 3 या मोहिमेसाठी इस्रोचा मोठा निर्णय!

चांद्रयान 3 च्या मोहिमेतून वगळण्यात आलेल्या एम वनिता यांच्याकडे आता पीडीएमएसएच्या डेप्युटी डायरेक्टर पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

  • Share this:

बेंगळुरु, 18 डिसेंबर : भारताची महत्वकांक्षी चांद्रयान 2 या मोहिमेत प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम पाहिलेल्या एम वनिता या चांद्रयान 3 च्या मोहिमेत मात्र नसणार आहेत. त्यांना या मोहिमेतून वगळण्यात आलं आहे तर रितू कारिधाल या मात्र डायरेक्टर म्हणून चांद्रयान 3 मोहिमेत काम पाहणार आहेत. चांद्रयान 2 मोहिमेतही त्या संचालक होत्या. तर आता वनिता यांच्याजागी पी वीरामुथुवेल प्रोजेक्ट डायरेक्टर असणार आहेत.

चांद्रयान 2 मध्ये एम वनिता यांच्याकडे मोहिमेतील सर्व सिस्टिमची जबाबदारी होती. याच सिस्टीममध्ये विक्रम लँडरचाही समावेश होता. चंद्रावर हार्ड लँडिंग झाल्याने अखेरच्या क्षणी विक्रमचा इस्रोशी असलेला संपर्क तुटला होता. दरम्यान, वनिता यांना चांद्रयान 3 मधून का वगळण्यात आलं नाही हे मात्र समजू सकलेले नाही. चांद्रयान 2 मोहिमेत रितू कारिधाल आणि एम वनिता यांच्या निवडीनंतर इस्रोचे कौतुक केले जात होते.

इस्रोकडून जारी करण्यात आलेल्या एका पत्रात एम वनिता या चांद्रयान 3 मोहिमेत नसतील अशी माहिती देण्यात आली आहे. एम वनिता यांच्याकडे आता पीडीएमएसएच्या डेप्युटी डायरेक्टर पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या जागी इस्रोच्या मुख्यालयात कार्यरत असलेल्या पी. वीरामुथुवेल यांनी प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून निवड़ केली गेली आहे.

प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीमचे कामही पी वीरामुथुवेल यांच्याकडे असणार आहे. याबाबतची माहिती इस्रोने 7 डिसेंबरला दिली होती. चांद्रयान 3 मोहिमेचे वेगवेगळे टप्पे आणि त्याबाबत इस्रोसमोर असलेल्या आव्हानानुसार प्रोजेक्ट डायरेक्टरसह 29 डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर असणार आहेत.

Published by: Suraj Yadav
First published: December 18, 2019, 12:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading