नव्या वर्षात इस्रोकडून गोड बातमी! चांद्रयान 3 ला सरकारने दिली मंजुरी

नव्या वर्षात इस्रोकडून गोड बातमी! चांद्रयान 3 ला सरकारने दिली मंजुरी

इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती इस्रोप्रमुख के सिवन यांनी सांगितलं आहे.

  • Share this:

बेंगळुरू, 01 डिसेंबर : इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती इस्रोप्रमुख के सिवन यांनी सांगितलं आहे. चांद्रयान 2 मध्ये चांगलं काम सुरू आहे. जरी अपेक्षित यश मिळालं नसलं तरी ऑर्बिटर काम करत आहे. पुढच्या 7 वर्षांपर्यंत आपल्याला माहिती पाठवत राहिल असंही त्यांनी सांगितलं. चांद्रयान मोहिमेसाठी तयारी सुरू करण्यात आल्याचंही के सिवन यांनी सांगितले. ते म्हणाले की, दुसऱ्या स्पेस पोर्टसाठी जमीन संपादीत करण्यात आली असून थूटुकुडी इथं उभारणी करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.

चंद्रावर मानवरहीत यान उतरविण्याची भारताची संधी काही महिन्यांपूर्वी थोडक्यात हुकली होती. Chandrayaan 2चा चंद्राच्या पृष्ठभागापासून काही अंतरवर असतानाच संपर्क तुटला होता. त्यामुळे ISROची महत्त्वाकांक्षी Chandrayaan 2 मोहिम पूर्ण यशस्वी होऊ शकली नव्हती. मात्र ISROने आशा सोडलेली नाही.

ISRO चंद्रावर सॉफ्ट लँडींगचा पुन्हा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास इस्रोचे प्रमुख के सिवन (K Sivan) यांनी दिल्ली IITच्या कार्यक्रमात बोलताना याआधी सांगितलं होतं. चांद्रयान मोहिमेत यानापासून वेगळं झाल्यानंतर Vikram Lander चंद्राच्या पृष्ठभागापासून फक्त काही अंतरावर असतानाच ते कोसळल्याचं नंतर स्पष्ट झालं. इस्रोच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण होताहेत त्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमामध्ये सिवन बोलत होते. ते म्हणाले, चांद्रयान-2 मोहिमेशी सगळ्यांच्या आशा-आकांक्षा जोडल्या होत्या.

वाचा : चांद्रयान 2 नंतर Chandrayaan 3 या मोहिमेसाठी इस्रोचा मोठा निर्णय!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 1, 2020 12:26 PM IST

ताज्या बातम्या