भारताचं चांद्रयान - 2 मोहिमेसाठी तयार, या तारखेला होणार लाँचिंग

भारताचं चांद्रयान - 2 मोहिमेसाठी तयार, या तारखेला होणार लाँचिंग

चांद्रयान -2 हे यान चंद्रावरच्या खनिजांबद्दल तपासणी करणार आहे. हे यान चंद्राच्या ज्या भागात पोहोचणार आहे त्या जागेवर आतापर्यंत कोणीही संशोधन केलेलं नाही. चंद्राचा हा दक्षिण ध्रुवावरचा भाग आहे.लाँचिंगनंतर हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जून : इस्रोच्या चांद्रयान - 2 मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. या चांद्रयान-2 ची अंतिम चाचणीही करण्यात आली आहे. तामिळनाडूच्या महेंद्रगिरीमध्ये ही यशस्वी चाचणी पार पडली. या मोहिमेसाठी हे चांद्रयान 19 जूनला बाहेर काढण्यात येणार आहे. त्यानंतर ते श्रीहरीकोटामधल्या लाँचपॅडपर्यंत पोहोचवलं जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार चांद्रयान - 2 चं लाँचिंग 9 जुलैला केलं जाणार आहे.

चांद्रयान - 2 ची वैशिष्ट्यं

भारतीय पेलोडमध्ये 8 ऑर्बिटर, 3 लँडर आणि 2 रोव्हर आहेत. त्याचं वजन आहे, 3.8 टन आहे.

मोहिमेचा काय आहे उद्देश ?

चांद्रयान -2 हे यान चंद्रावरच्या खनिजांबद्दल तपासणी करणार आहे. हे यान चंद्राच्या ज्या भागात पोहोचणार आहे त्या जागेवर आतापर्यंत कोणीही संशोधन केलेलं नाही.चंद्राचा हा दक्षिण ध्रुवावरचा भाग आहे.लाँचिंगनंतर हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. त्यानंतर ते लँडर आणि ऑर्बिटरपासून वेगळं होईल आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या आसपास ठरलेल्या जागी उतरेल.

चांद्रयान - 1

चांद्रयान -1 या मोहिमेनंतर 10 वर्षांनी इस्रोची ही चांद्रयान मोहीम होते आहे. 2009 मध्ये पाठवलेल्या चांद्रयानात चंद्राच्या कक्षेत फिरणारं ऑरबिटर होतं. पण चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून संशोधन करणारं रोव्हर त्यावेळी नव्हतं. यावेळी मात्र या यानाचं रोव्हर थेट चंद्रावर उतरणार आहे.

चांद्रयान - 1 या यानाने चंद्रावरचे पाण्याचे अंश शोधून काढले होते. त्याआधी 2008 मध्ये भारताने आपला उपग्रह यशस्वीपणे चंद्रावर पाठवला होता. या उपग्रहामार्फत चंद्राबद्दल महत्त्वाचं संशोधन करण्यात यश मिळालं होतं.

चंद्रावर उतरणार रोव्हर

आता चांद्रयान - 2 मोहिमेमधलं रोव्हर जेव्हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल तेव्हा चंद्राची आणखी रहस्यं उलगडता येतील.

इस्रोने पहिल्यांदा हे चांद्रयान - २ एप्रिलमध्ये पाठवायचं ठरवलं होतं. पण आता मात्र 9 जुलैला हे लाँच केलं जाईल, असा निर्णय झाला आहे.

===============================================================================================================

VIDEO : राज्य सरकारने घेतले 6 मोठे निर्णय, या आणि इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

First published: June 11, 2019, 5:05 PM IST

ताज्या बातम्या