S M L

'चांद्रयान - 2' मोहिमेची धुरा महिलांकडे, मोहीम 1 हजार कोटींची

भारताच्या चांद्रयान - 2 मोहिमेची तयारी पूर्ण होत आली आहे. या मोहिमेचं लाँचिंग 15 जुलैला करण्यात येणार आहे. मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे दोन महिला संशोधकांकडेच त्याचं नेतृत्व देण्यात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2019 06:52 PM IST

'चांद्रयान - 2' मोहिमेची धुरा महिलांकडे, मोहीम 1 हजार कोटींची

बंगळुरू, 12 मार्च : भारताच्या चांद्रयान - 2 मोहिमेची तयारी पूर्ण होत आली आहे. या मोहिमेचं लाँचिंग 15 जुलैला करण्यात येणार आहे. या मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे दोन महिला संशोधकांकडेच त्याचं नेतृत्व देण्यात आलं आहे.

प्रोजेक्ट डायरेक्टर एम. वनिता आणि मिशन डायरेक्टर रितु करिधल या महिला संशोधकांवर मोहिमेची धुरा असेल. याआधीही इस्रोच्या उपग्रह प्रक्षेपणासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये महिलांनी मोलाची भूमिका बजावली होती.

३० टक्के महिला संशोधक


आम्हाला या मोहिमेसाठी तज्ज्ञ संशोधकांची निवड करायची होती. मग त्यात महिला किंवा पुरुष असा काही निकष नव्हता. पण निवड झालेल्या संशोधकांमध्ये महिलांनी बाजी मारली आहे, असं इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितलं. चांद्रयान - 2 मोहिमेमध्ये 30 टक्के महिला आहेत, असंही ते म्हणाले. 15 जुलैला लाँचिंग झाल्यानंतर हे यान 6 किंवा 7 सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. हे लाँचिंग श्रीहरीकोटाहून पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी होणार आहे.



Loading...

चांद्रयान -2 हे यान चंद्रावरच्या खनिजांबद्दल तपासणी करणार आहे. हे यान चंद्राच्या ज्या भागात पोहोचणार आहे त्या जागेवर आतापर्यंत कोणीही संशोधन केलेलं नाही.चंद्राचा हा दक्षिण ध्रुवावरचा भाग आहे.लाँचिंगनंतर हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. त्यानंतर ते लँडर आणि ऑर्बिटरपासून वेगळं होईल आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या आसपास ठरलेल्या जागी उतरेल.

चांद्रयान - 1 मोहीम

चांद्रयान -1 या मोहिमेनंतर 10 वर्षांनी इस्रोची ही चांद्रयान मोहीम होते आहे. 2009 मध्ये पाठवलेल्या चांद्रयानात चंद्राच्या कक्षेत फिरणारं ऑरबिटर होतं. पण चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून संशोधन करणारं रोव्हर त्यावेळी नव्हतं. यावेळी मात्र या यानाचं रोव्हर थेट चंद्रावर उतरणार आहे.

चांद्रयान - 1 या यानाने चंद्रावरचे पाण्याचे अंश शोधून काढले होते. त्याआधी 2008 मध्ये भारताने आपला उपग्रह यशस्वीपणे चंद्रावर पाठवला होता. या उपग्रहामार्फत चंद्राबद्दल महत्त्वाचं संशोधन करण्यात यश मिळालं होतं.

आता चांद्रयान - 2 मोहिमेमधलं रोव्हर जेव्हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल तेव्हा चंद्राची आणखी रहस्यं उलगडता येतील.

=====================================================================================================

CycloneVayu: चक्रीवादळाची गुजरातकडे वेगानं कूच, पोरबंदरहून थेट ग्राऊंड रिपोर्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 12, 2019 06:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close