चांद्रयान - 2 बद्दल चांगली बातमी, यानाने पाठवला चंद्राचा पहिला प्रकाशमान फोटो

चांद्रयान - 2 बद्दल चांगली बातमी, यानाने पाठवला चंद्राचा पहिला प्रकाशमान फोटो

इस्रोच्या चांद्रयान - 2 ने चंद्राच्या पृष्ठभागाचं पहिलंवहिलं प्रकाशमान छायाचित्र पाठवलं आहे. इस्रोच्या ट्विटर अकाउंटवर हे छायाचित्र पोस्ट करण्यात आलंय.

  • Share this:

मुंबई, 17 ऑक्टोबर : इस्रोच्या चांद्रयान - 2 ने चंद्राच्या पृष्ठभागाचं पहिलंवहिलं प्रकाशमान छायाचित्र पाठवलं आहे. इस्रोच्या ट्विटर अकाउंटवर हे छायाचित्र पोस्ट करण्यात आलंय. हे छायाचित्र चंद्राच्या उत्तर गोलार्धाचं आहे.याआधीही चांद्रयान - 2 ने चंद्राची काही छायाचित्रं पाठवली होती. आता चंद्राच्या पृष्ठभागाचं हे छायाचित्र अत्यंत सुस्पष्ट आहे. चांद्रयान - 2 चंद्राचा 3 D नकाशाही तयार करणार आहे. चांद्रयान - 2 ने 20 ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता.

चांद्रयान - 2 मधलं विक्रम लँडर चंद्रावर उतरून तिथले फोटो पाठवण्यात अपयशी ठरलं. पण चांद्रयान - 2 मधल्या अत्याधुनिक यंत्रणेमुळे हे मिशन सुरूच आहे.विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून 2. 1 किमी दूर असताना या लँडरचा इस्रोसी संपर्क तुटला. त्यानंतर लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. आता मात्र चांद्रयान - 2 च्या ऑरबिटरने चंद्राची छायाचित्रं पाठवली आहेत.

(हेही वाचा : सोनं झालं स्वस्त पण चांदीला आली चमक, काय आहेत आजचे दर?)

==========================================================================================

VIDEO : सावरकरांसारखे राष्ट्रभक्त आणि बलिदान देणारे कुटुंब देशात नाही - अमित शहा

Published by: Arti Kulkarni
First published: October 17, 2019, 7:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading