'भारत अंतराळात कचरा वाढवतोय', पाकिस्तानच्या मंत्र्यांची मुक्ताफळं

'भारत अंतराळात कचरा वाढवतोय', पाकिस्तानच्या मंत्र्यांची मुक्ताफळं

पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. भारताच्या अंतराळ मोहिमांमुळे अंतराळात कचऱ्याचं प्रमाण वाढत चाललं आहे, अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली आहेत.

  • Share this:

इस्लामाबाद, 3 डिसेंबर : पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. भारताच्या अंतराळ मोहिमांमुळे अंतराळात कचऱ्याचं प्रमाण वाढत चाललं आहे, अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली आहेत. फवाद चौधरी यांनी ट्वीट केलं आहे, भारत हा अंतराळात कचरा निर्माण करण्याला जबाबदार आहे. भारताच्या मोहिमा पूर्ण इकोसिस्टीमसाठीच धोकादायक आहेत. त्यावर गांभिर्याने लक्ष द्यायला हवं.

Chandrayaan 2चं विक्रम लँडर चंद्रावर नेमकं कुठे आहे याचा ठावठिकाणाच लागत नव्हता.. पण नासाच्या एका ऑर्बिटरला विक्रम लँडरच्या खुणा सापडल्या आहेत. नासानं ट्वीट करून ही माहिती दिली आहे. 7 सप्टेंबर रोजी इस्त्रोकडून चांद्रयान 2 अंतराळात पाठवण्यात आलं होतं. लँडर विक्रम चंद्रापासून 2 किमी अंतरावर असताना त्याचा संपर्क तुटला. त्यानंतर चंद्राच्या कक्षेत असलेल्या ऑर्बिटरनं विक्रम साधारण कुठे पडलेलं असू शकतं याचे संभाव्य फोटो इस्रोला पाठवले होते.. त्यानंतर नासाने मंगळवारी पहाटे ट्वीट करून याबाबत माहिती दिली.

(हेही वाचा : खूशखबर! पुढच्या वर्षी भारतीयांना मिळणार सगळ्यात जास्त पगार)

'नासा'च्या ट्वीटनंतर टीका

चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरचे अवशेष मिळाल्याची बातमी नासाने दिल्यानंतर फवाद चौधरी यांनी हे ट्वीट केलं आहे. भारताने सुमारे 3 महिने आधी विक्रम लँडर उतरवण्याचा प्रयत्न केला होता.

विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडिंग यशस्वी झालं नाही तरी भारताची चांद्रयान -2 मोहीम यशस्वी झाली आहे, असा दावा इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केलाय. चांद्रयान - 2 मधल्या ऑर्बिटरने चंद्राची प्रकाशमान छायाचित्रंही पाठवली आहेत. त्याबरोबरच चंद्राचा 3 D नकाशा तयार करण्याचं काम ऑर्बिटर करणार आहे.

(हेही वाचा : आता 3 दिवसांतच मोबाइल नंबर होणार पोर्ट, या तारखेपासून नवा नियम लागू)

चांद्रयान -3 कडे लक्ष

भारताने मोठ्या प्रमाणात अंतराळ मोहिमा यशस्वी केलेल्या असताना फवाद चौधरी यांचं हे विधान दुर्दैवीच आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातायत. विक्रम लँडरचं नेमकं काय झालं असेल याचं उत्तर 'नासा' ने काढलेल्या एका छायाचित्रात मिळालं. आता पुन्हा एकदा चांद्रयान - 3 मोहिमेसाठी इस्रो सज्ज होणार आहे. त्यामुळे याकडे अपयशाच्या दृष्टीने पाहून चालणार नाही,असं मत आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे.

==============================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2019 08:53 PM IST

ताज्या बातम्या