BREAKING NEWS : चांद्रयान -2 मोहिमेबद्दल इस्रोने दिली ही महत्त्वाची माहिती

विक्रम लँडरशी संपर्क तुटला असला तरी इस्रोने पाठवलेला ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत राहणार आहे. पुढची 7 वर्षं या ऑर्बिटरचं काम सुरू राहणार असून हे ऑर्बिटर चंद्राबद्दल महत्त्वाची माहिती पाठवत राहील.

News18 Lokmat | Updated On: Sep 7, 2019 08:27 PM IST

BREAKING NEWS : चांद्रयान -2 मोहिमेबद्दल इस्रोने दिली ही महत्त्वाची माहिती

बंगळुरू, 7 सप्टेंबर : चांद्रयान -2 मोहिमेमध्ये शेवटच्या टप्प्यात अडथळे आले असले तरी या मोहिमेचं 90 ते 95 उद्दिष्ट साध्य झालं आहे,असं इस्रोने अधिकृतरित्या म्हटलं आहे.

विक्रम लँडरशी संपर्क तुटला असला तरी इस्रोने पाठवलेला ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत राहणार आहे. पुढची 7 वर्षं या ऑर्बिटरचं काम सुरू राहणार असून हे ऑर्बिटर चंद्राबद्दल महत्त्वाची माहिती पाठवत राहील.

विक्रम लँडरशी संपर्क करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे अजूनही आशा कायम आहे, असं इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी म्हटलं आहे. डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केलं.

<blockquote class="twitter-tweet"><p lang="en" dir="ltr">Indian Space Research Organisation (ISRO) Chief, K Sivan: The last portion was not executed the right way, in that phase only we lost link with the Lander, and could not establish communication subsequently. (Courtesy: DD) <a href="https://twitter.com/hashtag/Chandrayaan2Landing?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#Chandrayaan2Landing</a> <a href="https://t.co/UkqMnBB5Fx">pic.twitter.com/UkqMnBB5Fx</a></p>&mdash; ANI (@ANI) <a href="https://twitter.com/ANI/status/1170349174967005190?ref_src=twsrc%5Etfw">September 7, 2019</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

काय झालं अखेरच्या क्षणी?

Loading...

चंद्रावर उतरण्याच्या भारताच्या कित्येक वर्षांच्या स्वप्नाला सध्या धक्का बसला. विक्रम लँडर चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटर आणि एक मिनिटाच्या अंतरावर असताना त्याचा संपर्क तुटला. मध्यरात्री पावणे दोनच्या दरम्यान विक्रम लँडरच्या चंद्रावर लँडिंगची प्रक्रिया सुरू झाली. विक्रम आणि चंद्रातलं अंतर कमी करण्यात इस्रोला यश आलं. पण सॉफ्ट लँडिंगचा शेवटच्या खडतर टप्प्याकडे सर्व जगाचं लक्ष लागलेलं असतानाच विक्रमकडून सिग्नल येणं बंद झालं. त्यामुळे इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी नजरा लावून बसलेल्या भारतीयांची निराशा झाली.

गरीब शेतकऱ्याचा मुलगा, पायात नव्हती चप्पल, के. सिवन यांचा प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी इस्रोच्या कंट्रोल सेंटरमध्ये उपस्थित होते. शास्त्रज्ञांना धीर त्यांनी त्यांचा अभिमान असल्याचं सांगितलं.

===========================================================================================================

VIDEO: 'चंद्रावर जाण्याचं स्वप्न कायम', मोदींनी दिला इस्रोच्या शास्त्रज्ञांना धीर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2019 08:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...