चांद्रयान 2: 'विक्रम'शी संपर्क करण्याची अखेरची होप; X-Band कमाल करणार का?

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे विशेषत: ISROच्या चांद्रयान 2 (Chandrayaan-2)मोहीमेकडे लागले आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2019 03:43 PM IST

चांद्रयान 2: 'विक्रम'शी संपर्क करण्याची अखेरची होप; X-Band कमाल करणार का?

श्रीहरीकोटा, 11 सप्टेंबर: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे विशेषत: ISROच्या चांद्रयान 2 (Chandrayaan-2)मोहीमेकडे लागले आहे. चांद्रयान 2चा लँडर विक्रम (Vikram) चंद्राच्या भूमीवर उतरला खरा पण त्याचे सॉफ्ट लँन्डिंग ऐवजी हार्ड लँन्डिंग झाले आणि संपर्क तुटला. तेव्हापासून विक्रमशी संपर्क करण्याचे ISROचे प्रयत्न सुरु आहेत. ISROच्या या प्रयत्नांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. चंद्रभूमीवर विक्रमचा ठाव ठिकाणी लागल्यानंतर त्याच्याशी पुन्हा एकदा संपर्क करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत प्रयत्नांना यश आले नसले तरी ISROच्या आशा आता केवळ एकाच गोष्टीवर अवलंबून आहेत.

लँडर विक्रमशी पुन्हा संपर्क करण्याचा एकच मार्ग आता शिल्लक आहे आणि तो म्हणजे एक्स बँड (X-Band) होय. चांद्रयान 2 मोहीमेशी संबंधित एका शास्त्रज्ञाने दिलेल्या माहितीनुसार, असे काही मार्ग शिल्लक आहेत ज्यामुळे विक्रमशी पुन्हा संपर्क करता येऊ शकतो. त्यापैकी एक म्हणजे X-Band होय. X-Band आणि ग्राऊंड स्टेशनचा संपर्क होऊ शकतो. सर्वसाधारणपणे याचा वापर रडार, सॅटेलाइट कम्युनिकेशन आणि कम्यूटर नेटवर्कसाठी केला जातो.

आपलं विक्रम लँडर चंद्रावर उतरलं तो भाग नेमका आहे तरी कसा?

शनिवारी सकाळी लँडर विक्रमशी संपर्क तुटला होता. चंद्राच्या भूमीवर विक्रम कुठे आहे याचा शोध लागून आता पाच दिवस झाले आहेत. अद्याप त्याच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. विक्रमशी संपर्क करण्यासाठी कर्नाटकमधील बयालालु गावात 32 मीटर अँटीनाचा वापर केला जात आहे. या अँटीनाचा स्पेस नेटवर्क सेंटर बेंगळूरूमध्ये आहे. ISROकडून चांद्रयान 2च्या ऑर्बिटरच्या मार्फत विक्रमशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

फक्त 10 दिवस शिल्लक

Loading...

लँडर विक्रम ऊर्जा निर्मिती करत आहे की नाही याबद्दल सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही. ISROचे चेअरमन शिवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या उपलब्ध असलेल्या डेटाचा अॅनॅलिसिस करण्याचे काम सुरु आहे. विक्रमला केवळ एक लूनर डे या काळातच सूर्याची थेट ऊर्जा मिळणार आहे. एक लूनर डे म्हणजे पृथ्वीवरील 14 दिवस होय. या 14 दिवसांपैकी 4 दिवस वाया गेले आहेत. आता ISROकडे केवळ 10 दिवसाचा वेळ शिल्लक आहे.

वाहतूक पोलिसाची मुजोरी! सर्वसामान्यावर दमदाटी करत मारली लाथ VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: isrovikram
First Published: Sep 11, 2019 03:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...