'विक्रम'शी संपर्क तुटला तरीही Chandrayaan 2 यशस्वी, कसं ते जाणून घ्या

'विक्रम'शी संपर्क तुटला तरीही Chandrayaan 2 यशस्वी, कसं ते जाणून घ्या

भारताच्या चांद्रयान मोहिमेत लँडर विक्रमशी संपर्क तुटला असला तरीही ही मोहिम वर्षभर सुरू राहणार आहे.

  • Share this:

बेंगळुरू, 07 सप्टेंबर : भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेला अखेरच्या क्षणी अडथळा आला आणि लँडर विक्रम चंद्रापासून 2 किलोमीटर अंतरावर असताना त्याचा संपर्क तुटला. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना अपेक्षित असं यश या मोहिमेला मिळालं नसलं तरी ही मोहिम अयशस्वी ठरली असं म्हणता येणार नाही. इस्त्रोच्या सर्व संशोधकांनी केलेली मेहनत वाया गेलेली नाही.

लँडर विक्रमशी संपर्क तुटला असला तरी चांद्रयान मोहिम पुढचे एक वर्ष सुरू राहणार आहे. चांद्रयान 2 चे लँडर आणि रोव्हरशी संपर्क तुटला आहे. पण चंद्राच्या कक्षेत चांद्रयान 2 चे ऑर्बिटर त्याचं काम करत आहे. ऑर्बिटरच्या माध्यमातून फोटो इस्त्रोला मिळत राहतील.

शास्त्रज्ञांनी सांगितलं की, लँडरशी संपर्क तुटल्यानं मोहिमेला 5 टक्के इतकाच धक्का बसला आहे. तर 95 टक्के काम सुरू राहणार आहे. 5 टक्क्यांमध्ये लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी संपर्क तुटला आहे. यामुळं चंद्राच्या पृष्ठभूमीची माहिती मिळणार नाही. मात्र ऑर्बिटरच्या सहाय्यानं इतर माहिती मिळत राहणार आहे. चांद्रयान 2 चा ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत राहणार आहे.

ज्या रोव्हरचा संपर्क तुटला आहे तो चंद्राच्या भूमीवर उतरल्यानंतर फक्त 14 दिवस काम करू शकतो. तर ऑर्बिटर मात्र एक वर्षभर काम करत राहणार आहे. ऑर्बिटर चंद्राचे अनेक फोटो काढून इस्त्रोला पाठवणार आहे. ऑर्बिटरकडून लँडरची माहितीसुद्धा मिळवता येईल. ऑर्बिटरनं लँडर विक्रमचे फोटो काढले आणि ते इस्त्रोला पाठवले तर संपर्क तुटण्याचं खरं कारण समजू शकेल.

भारतानं चांद्रयान 2 चे यशस्वी प्रक्षेपण केलं. त्यासाठी जीएसएलव्ही मार्क 3 या रॉकेटचा वापर करण्यात आला होता. त्यातून चांद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहचलं होतं. इस्त्रोच्या अंतराळ मोहिमेचं हे मोठं यश होतं. चंद्राच्या कक्षेत ऑर्बिटर पोहचवणं सोपं नव्हतं. दोन वेगाने फिरणाऱ्या गोष्टींमधून लक्ष्य साधायचे होते. हे लक्ष काही हजारो किलोमीटर होतं. वाचा : Chandrayaan-2 : लँडर 'विक्रम'चं काय झालं? या आहेत 3 शक्यता

चांद्रयान 2 यासाठी यशस्वी म्हणता येईल कारण याचा खर्च इतर देशांच्या तुलनेत खूपच कमी झाला. चांद्रयान 2 फक्त 140 मिलियन डॉलर म्हणजेच 1 हजार कोटींचा खर्च आला. अमेरिकेच्या अपोलो मिशनसाठी 100 बिलियन डॉलर म्हणजेच 7 लाख कोटींपर्यंत खर्च आला होता. चांद्रयान 2 मोहिमेनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था यापुढे अशा प्रकारच्या मोहिमा चालवू शकते. यात मंगळ मोहिमेचासुद्धा समावेश आहे.

चंद्रयान मोहिमेचं कवी कसं वर्णन करतील, पाहा UNCUT पंतप्रधान मोदींचं भाषण

Published by: Suraj Yadav
First published: September 7, 2019, 12:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading