Chandrayaan-2 : लँडर 'विक्रम'चं काय झालं? या आहेत 3 शक्यता

Chandrayaan-2 : लँडर 'विक्रम'चं काय झालं? या आहेत 3 शक्यता

या तीन शक्यता असल्या तरी त्या प्राथमिक माहितीवर आधारीत आहेत. जोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत विक्रमकडून आलेल्या माहितीचं सखोल विश्लेषण केलं जात नाही तोपर्यंत अंतिम निष्कर्ष काढता येणार नाही.

  • Share this:

मुंबई 7 सप्टेंबर : शेवटच्या टप्प्यापर्यंत उत्तम काम करणाऱ्या आणि सर्व देशाच्या नजरा ज्याच्याकडे लागल्या होत्या तो लँडर 'विक्रम' सध्या बेपत्ता आहे. शेवटच्या टप्प्यात त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला असं इस्त्रोने जाहीर केलं आहे. चंद्राच्या दक्षिण धृवापासून त्याचं अंतर फक्त 2.1 किमी एवढं राहिलं होतं. त्याच वेळी विक्रमचा संपर्क तुटला. त्याच्याशी संपर्क करण्याचा शास्रज्ञ प्रयत्न करत होते मात्र त्यांना यश आलं नाही. त्यामुळे 'विक्रम'चं नेमकं काय झालं याबद्दल विविध तर्क व्यक्त करण्यात येत आहेत. मात्र ही मोहीम शेवटच्या टप्प्यापर्यंत जाणं हेही एक मोठं यश असल्याचं शास्रज्ञांचं मत आहे. यातून इस्त्रोला अनेक गोष्टी शिकता येणार आहेत.

(Chandrayaan-2 लँडर 'विक्रम'चा संपर्क तुटला, पंतप्रधान म्हणाले ISROचा अभिमान)

या आहेत त्या 3 शक्यता

पहिली शक्यता - वेग कमी करत असताना लँडर 'विक्रम'मध्ये अचानक तांत्रिक दोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संपर्क तुटू शकतो. नंतर काही वेळाने पुन्हा संपर्क प्रस्थापित केला जाऊ शकतो. मात्र आता त्याची शक्यता खूपच कमी आहे.

दुसरी शक्यता - लँडर 'विक्रम' चंद्रावर उतरलं असावं मात्र त्याचा संपर्क तुटला असावा अशीही शक्यता आहे. तांत्रिक बिघाडामुळे तो संपर्क तुटला असावा. असं झालं असेल तर मात्र पुन्हा संपर्क करणं अवघड आहे.

(Chandrayaan-2 : श्वास रोखून धरायला लावणारे ते क्षण...)

तिसरी शक्यता - लँडर 'विक्रम' शेवटच्या टप्प्यात खाली येत असताना चंद्रावर आदळून ते नष्ट झालं असेल अशीही शक्यता व्यक्त केलीय जातेय. कारण त्यावेळचा त्याचा वेग आणि तिथली परिस्थिती यामुळे असं होण्याची शक्यता जास्त आहे.

या तीन शक्यता असल्या तरी त्या प्राथमिक माहितीवर आधारीत आहेत. जोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत विक्रमकडून आलेल्या माहितीचं सखोल विश्लेषण केलं जात नाही तोपर्यंत अंतिम निष्कर्ष काढता येत नसल्याचं इस्रोच्या तज्ज्ञांचं मत आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 7, 2019, 6:25 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading