ISROने जाहीर केली चांद्रयान-2च्या प्रक्षेपणाची नवी तारीख जाहीर!

ISROने जाहीर केली चांद्रयान-2च्या प्रक्षेपणाची नवी तारीख जाहीर!

तांत्रिक बिघाडामुळे लांबणीवर पडलेल्या चांद्रयान-2च्या प्रक्षेपणाची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.

  • Share this:

श्रीहरीकोटा, 18 जुलै: तांत्रिक बिघाडामुळे लांबणीवर पडलेल्या चांद्रयान-2च्या प्रक्षेपणाची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने गुरुवारी ही माहिती दिली आहे. ISROने दिलेल्या माहितीनुसार आता चांद्रयान-2चे प्रक्षेपण 22 जुलै रोजी दुपारी 2.43 मिनिटांनी केले जाणार आहे.

याआधी 15 जुलै रोजी मध्य रात्री चांद्रयान-2चे प्रक्षेपण होणार होते. पण ऐनवेळी तांत्रिक बिघाड लक्षात आल्याने ही मोहिम स्थगित करण्यात आली होती. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून जीएसएलव्ही मार्क 3च्या मदतीने चांद्रयान-2 अवकाशात झेपवणार होते. पण प्रक्षेपण होण्याच्या 56 मिनिटे आणि 24 सेकंद आधी मोहीम थांबवण्यात आली. जीएसएलव्ही मार्क 3 मध्ये इंधन भरत असताना तांत्रिक चूक आढळली आणि हा निर्णय घेण्यात आला. चांद्रयान-2चे प्रक्षेपण थांबवण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला. संपूर्ण मोहीम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात इतकी मोठी तांत्रिक दोष असल्यामुळेच मोहीम पुढे ढकलण्यात आली. जर या दोषाकडे दु्र्लक्ष केले असते तर संपूर्ण मोहीमच फसली असती आणि 11 वर्षापासून भारतीय शास्त्रज्ञांनी पाहिलेले स्वप्न व 960 कोटी रुपये पाण्यात गेले असते.

जीएसएलव्ही मार्क 3 इंधन भरत असताना हा दोष समोर आला नसता तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. भारताची महत्वाकांक्षी मोहीम अपयशी ठरली असती. चंद्राच्या ज्या भागावर आजपर्यंत कोणीही पोहोचले नाही तेथे भारताचे चांद्रयान-2 जाणार होते. या मोहिमेत चंद्राच्या भूमीवर सॉफ्ट लँडिंगद्वारे रोव्हर उतरवला जाणार होता.

VIDEO: निवडणुकीआधीच चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं आघाडीच्या गोटात खळबळ

First published: July 18, 2019, 11:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading