है तैयार हम ! Chandrayaan-2 आज अवकाशात झेपावणार

है तैयार हम ! Chandrayaan-2 आज अवकाशात झेपावणार

Chandrayaan 2 : भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो)चांद्रयान 2 मोहिमेसाठी सज्ज झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जुलै : अंतराळात भारत आज नवा इतिहास रचणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो)चांद्रयान 2 मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. यासाठी रविवारी (21 जुलै)संध्याकाळी 6.43 वाजल्यापासून काउंटडाऊनदेखील सुरू झालं आहे. इस्त्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी याबाबतची पुष्टी दिली आहे. त्यांनी सांगितलं की, 'चांद्रयान मोहिमेतील तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला आहे'. GSLV मार्क III-M1 या प्रक्षेपकाच्या मदतीनं चांद्रयान 2 उड्डाण भरणार आहे.

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून अवकाश झेपावल्यानंतर 52 दिवसांनी चांद्रयान 2 चंद्रावर पोहोचेल. यानंतर ते 16 दिवस पृथ्वीची परिक्रमा करून चंद्राच्या दिशेनं रवाना होईल.

(पाहा : आदित्य ठाकरेंची यात्रा म्हणजे प्रशांत किशोर कन्सल्टंसीचे प्रॉडक्ट)

तांत्रिक बिघाडामुळे प्रेक्षपण पुढे ढकललं

चांद्रयान 2 चं प्रक्षेपण सोमवारी (15 जुलै )काही तांत्रिक कारणामुळे लांबणीवर टाकण्यात आलं. ठरलेल्या वेळेनुसार चांद्रयान -2 ही मोहीम पहाटे 2 वाजून 51 मिनिटाला झेपवणार होती. यासाठी काउंटडाऊनही सुरू झालं होतं. पण प्रत्यक्ष प्रक्षेपणाला 56 मिनिटं 24 सेकंद उरले असताना काही तांत्रिक दोष निर्माण झाला आणि प्रक्षेपण स्थगित करण्यात आल्याची अधिकृत घोषणा इस्त्रोच्या वतीनं करण्यात आली.

(पाहा : SPECIAL REPORT : मीच पुन्हा परत येतोय, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला थेट इशारा)

तुफान आलंया....पाण्याच्या थेंबानं गावात केली क्रांती

First published: July 22, 2019, 9:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading