Chandrayaan-2 आता चंद्रापासून फक्त एक टप्पा दूर; ISRO चं आणखी एक मोठं यश

Chandrayaan-2  आता चंद्रापासून फक्त एक टप्पा दूर; ISRO चं आणखी एक मोठं यश

चांद्रयान मोहिमेतला आणखी एक महत्त्वाचा टप्पा शुक्रवारी यशस्वी झाला. आता ऐतिहासिक यशापासून भारत फक्त 7 दिवस आणि शंभर किलोमीटर दूर आहे.

  • Share this:

बेंगळुरू, 30 ऑगस्ट : चांद्रयान मोहिमेतला आणखी एक महत्त्वाचा टप्पा शुक्रवारी यशस्वी झाला. चांद्रयान 2 चंद्राच्या आणखी जवळ जाऊन पोहोचलं आहे. ISRO ने या यशाची माहिती त्यांच्या Twitter हँडलवरून दिली. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6 वाजून 18 मिनिटांनी कक्षा बदलली. भारताच्या अंतराळ मोहिमेतलं महत्त्वाकांक्षी चांद्रयान2 ठरल्याप्रमाणे चौथ्या कक्षेत पोहोचलं आहे. आता शेवटची कक्षा बाकी आहे. चंद्रापासून भारताचं हे यान आता फक्त 100 किलोमीटर येईल. येत्या 7 सप्टेंबरला ऑरबिटपासून वेगळं होत चंद्राच्या भूमीवर यान उतरणार आहे. आतापर्यंतचा चांद्रयान 2 चा प्रवास अपेक्षेप्रमाणे झाला आहे. आता ऐतिहासिक यशापासून भारत फक्त 7 दिवस आणि शंभर किलोमीटर दूर आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने ISRO ने चांद्रयान 2 मोहिमेच्या ताज्या अपडेट्सविषयी माहिती दिली आहे.

चार महत्त्वाचे टप्पे

चांद्रयान 2 आणखी 4 टप्पे आणि कक्षा पार करायच्या आहेत. इस्रोच्या मते चांद्रयान 2 ची दिशा वेग वेगळ्या दिवशी बदलली जाईल. नियोजित तारखेनुसार 21, 28, 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी चांद्रयान 2 ची दिशा बदलली जाईल. त्यानंतर चांद्रयान 2 चंद्रापासून केवळ 100 किलो मीटरवर असेल. 7 सप्टेंबर रोजी लॅडर विक्रम त्याच्या ऑर्बिटरपासून वेगळे होईल. त्यानंतर लॅडर विक्रम 7 सप्टेंबर रोजी चंद्राच्या जमीनीवर उतरेल.

ते 15 मिनिट असतील कळीचे

चांद्रयान 2 मोहिमेतील लँडिंगच्या वेळी 15 मिनिटे अत्यंत महत्त्वाची असणार आहेत. चंद्राच्या भूमीपासून 30 किलो मीटर अंतरावर लँडिंगच्या आधी चांद्रयान 2चा वेग अंत्यत कमी केला जाईल. सॉफ्ट लँडिंग करण्यात भारत जर यशस्वी ठरला तर अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ चौथा देश ठरेल. अशी कामगिरी आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन यांनी केली आहे.

चांद्रयान 2चा संपूर्ण प्रवास; व्हिडिओ पाहून तुम्ही कराल ISROला सॅल्यूट!

चंद्राच्या जमिनीवर उतरल्यानंतर 6 चाकाचे रोव्हर विक्रम लँडरपासून वेगळ होईल. यासाठी 4 तासांचा वेळ लागेल. हे ऑर्बिटर एक वर्षापर्यंत चंद्राच्या भोवती फिरणार होते. पण आता त्याचा कालावधी वाढवून दोन वर्ष करण्यात आले येणार आहे.

चांद्रयान-2ची वैशिष्ट्ये

1) चांद्रयान-2चे वजन 3.8 टन इतके आहे. आठ हत्तींच्या वजनाच्या इतके आहे हे वजन

2) यात 13 भारतीय पेलोड असतील त्यातील 8 ऑर्बिटर, 3 लँडर आणि 2 रोव्हर असतील. याशिवाय NASAचे एक पॅसिव्ह एक्सपेरिमेंट देखील असेल.

3) चांद्रयान-2 चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणार आहे. आजपर्यंत चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणारी मोहिम झालेली नाही.

4) भविष्यातील अनेक मोहिमांसाठी चांद्रयान-2 एक उदाहरण ठरणार आहे.

5) या मोहिमेद्वारे भारत चंद्राच्या दक्षिम ध्रुवावर पोहोचणार आहे. या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न आजपर्यंत कोणत्याही देशाने केलेला नाही.

6) चांद्रयान-2 एकूण 12 भारतीय उपकरणे घेऊन जाणार आहे.

---------------------------------------

SPECIAL REPORT : मराठवाड्यात राष्ट्रवादीला जबर धक्का, ज्यांना राज्यमंत्री केलं तेच भाजपच्या उंबरठ्यावर!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 07:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...